Latest OTT Release This Week: ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या वीकेंडला अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. या वीकेंडला ओटीटीवर काय पाहावं, असा विचार तुम्ही करत असाल ही बातमी तुमच्यासाठी आहे. १८ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट या कालावधीत कोणते चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत, त्याच्या यादीवर नजर टाकुयात. या यादीत दक्षिणेकडील चित्रपट ‘हरी हर वीरा मल्लू’ ते काजोलचा हॉरर ‘मां’ यांचा समावेश आहे.

मां

Maa on Netflix: काजोलची मुख्य भूमिका असलेला सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर चित्रपट ‘मां’ २७ जूनला थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. आता जवळपास दोन महिन्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

हरी हर वीरा मल्लू

Hari Hara Veera Mallu : पवन कल्याणचा ‘हरी हरा वीरा मल्लू’ हा चित्रपट २४ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. याला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. तुम्ही तो थिएटरमध्ये पाहिला नसेल तर घरबसल्या पाहू शकता.

मारीसन

Maareesan on Netflix : मारीसन हा एक तमिळ ड्रामा थ्रिलर चित्रपट आहे. यात फहाद फासिल आणि वादिवेलु मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात अल्झायमरने ग्रस्त असलेल्या एका वृद्ध व्यक्तीची कहाणी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट आज २२ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

थलायवन-थलायवी

Thalaivan Thalaivii on OTT: विजय सेथुपतीचा ‘थलायवन-थलायवी’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. तुम्ही आजपासून तो प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

अमार बोस

Aamar Boss on OTT: हिंदीबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. पण ‘अमार बोस’ हा बंगाली चित्रपट आहे. अभिनेत्री राखी गुलजार यांची महत्त्वाची भूमिका असलेला हा चित्रपट तुम्ही आज २२ ऑगस्टपासून झी5 वर पाहू शकता.