घरबसल्या जगभरातील उत्तम, दर्जेदार कंटेंट आपल्याला वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येतो. तुम्हाला ओटीटीवर ॲक्शन आणि थ्रिलर चित्रपट, वेब सीरीज पाहण्याची खूप आवड असेल आणि चांगल्या कलाकृतींच्या शोधात तुम्ही असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नेटफ्लिक्सवर अनेक चित्रपट व सीरिज उपलब्ध आहेत, ज्या तुम्ही या वीकेंडला पाहू शकता. नेटफ्लिक्सवरील सर्वोत्तम वेब सीरिजबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. या सीरिजना IMDb वर १० पैकी ८ पेक्षा जास्त रेटिंग आहे. यात तुम्हाला जबरदस्त ॲक्शन, रोमान्स आणि सस्पेन्स पाहायला मिळतील. चला तर जाणून घेऊयात नेटफ्लिक्सवरील सर्वोत्तम आठ चित्रपट आणि वेब सीरिजची यादी.

मार्वल डेअरडेव्हिल

नेटफ्लिक्सवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणजे मार्वलचा ‘डेअरडेव्हिल’ होय. या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन आहे. यामध्ये चार्ली कॉक्स, अल्डेन हॅन्सन यांच्यासह अनेक कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला आहे. याला आयएमडीबीवर १० पैकी ८.६ रेटिंग मिळाले आहे.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ ते ‘मडगांव एक्सप्रेस’, शुक्रवारी OTT वर होणार मनोरंजनचा धमाका; वाचा कलाकृतींची संपूर्ण यादी

नार्कोस

अमेरिकन ड्रामा सीरिज नार्कोस ख्रिस ब्रँकाटो, कार्लो बर्नार्ड आणि डग मिरो यांनी एकत्र येऊन तयार केली आहे. या सीरिजचे आयएमडीबी रेटिंग ८.८ आहे.

स्वीट गर्ल

या यादीत २०२१ साली प्रदर्शित झालेल्या स्वीट गर्ल या चित्रपटाचाही समावेश आहे. आपल्या पत्नीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी निघालेल्या व्यक्तीची कहाणी यात दाखविण्यात आली आहे.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

माय नेम इज वेंडेटा

२०२२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं प्रेक्षक, सोशल मीडिया युजर्स आणि समीक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे.

6 अंडरग्राउंड

या सीरिजची कथा अशा सहा लोकांची आहे, ज्यांना अनेक कठीण कामं करण्यास सांगितलं जातं. ही कामं पूर्ण करून ते त्यांचे भविष्य बदलू शकतात.

अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित

मनी हाइस्ट

एका बँकेच्या लुटीची ही गोष्ट आहे. खूप गाजलेल्या या वेब सीरिजमध्ये सस्पेन्स आणि जबरदस्त थरारचा मिलाफ आहे. या सीरिजचा प्रत्येक सीझन खूपच रोमांचक आहे.

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

कोहरा

ही नेटफ्लिक्सवरील एक थ्रिलर सीरिज आहे. या सीरिजची कथा एका तरुण मुलाची आहे ज्याचा त्याच्या लग्नाच्या एक दिवस आधी मृत्यू होतो. या खूनाचं रहस्य उलगडताना पोलिसांसमोरील आव्हानं आणि नातेसंबंधातील गुंतागुंत यात पाहायला मिळते. यात बरुण सोबती मुख्य भूमिकेत आहे.

“ती मला समजू शकली नाही”, ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्याने सांगितलं मराठी अभिनेत्रीशी ब्रेकअपचं कारण; म्हणाला…

दिल्ली क्राइम

नेटफ्लिक्सवरील वेब सीरिज दिल्ली क्राइम खूपच गुंतवून ठेवणारी आहे. या सीरिजमध्ये निर्भया प्रकरण दाखवण्यात आले होते. यामध्ये शेफाली शाह, रसिका दुग्गल, राजेश तेलंग, तिल्लोत्तमा शोम अशी तगडी स्टारकास्ट आहे.