Best Psychological Suspense Thriller Film Sony Liv: ओटीटीवर जगभरातील कंटेंट तुम्ही घरबसल्या पाहू शकता. विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही कॉमेडी, हॉरर, थ्रिलर, कल्ट क्लासिक असे अनेक जॉनरचे चित्रपट पाहू शकता. लोक आपल्या आवडीच्या जॉनरचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहतात.

तुम्हाला जर सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील तर तर ओटीटीवर एक उत्तम चित्रपट उपलब्ध आहे. हा चित्रपट पाहून तुमचं डोकं चक्रावून जाईल. या चित्रपटातील सस्पेन्स पाहून तुम्ही चित्रपट संपेपर्यंत स्क्रीनवरून नजर हटवणार नाही. हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.

सर्वात उत्तम दाक्षिणात्य सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट

या चित्रपटाचे नाव ‘बोगेनविलिया’ आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमल नीरदने केलं होतं. या चित्रपटात ‘पुष्पा’ फेम फहाद फासिल मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी फहादच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं होतं.

फहादबरोबरच सिनेमात ज्योतिर्मयी, कुंचाको बोबन यांनी देखील भूमिका केल्या आहेत. ‘बोगेनविलिया’ नावाचा हा चित्रपट ओटीटीवर असून तुम्ही तो घरी बसून पाहू शकता.

‘बोगेनविलिया’ चित्रपटाची कथा नेमकी काय?

या २ तास २४ मिनिटांच्या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास, एका महिलेचा अपघात होता. यानंतर तिची स्मरणशक्ती कमी होऊ लागते. दुसरीकडे, शहरातून तीन मुली बेपत्ता होतात. त्या मुली शेवटच्या त्याच महिलेबरोबर दिसल्या होत्या. या प्रकरणाचा नंतर तपास सुरू होतो आणि त्यात जे ट्विस्ट येतात ते पाहून तुम्ही चक्रावून जाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओटीटीवर कुठे पाहायचा चित्रपट?

‘बोगेनविलिया’ हा चित्रपट ओटीटीवर उपबल्ध आहे. तुम्ही तो ओटीटी प्लॅटफॉर्म Sony Liv वर सहज पाहू शकता. या चित्रपटाला IMDb वर 6.4 रेटिंग मिळाले आहे.