Romantic Movie on Prime Video: तुम्हाला ओटीटीवर रोमँटिक चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर आम्ही तुम्हाला एका उत्तम रोमँटिक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटात प्रेम, सस्पेन्स आणि गुन्हेगारीचा मिलाफ पाहायला मिळतो. या चित्रपटाचे नाव ‘डीप वॉटर’ आहे.

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल ‘डीप वॉटर’ हा एक इरॉटिक सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमा आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक एड्रियन लायन यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात हॉलीवूड स्टार बेन एफ्लेक आणि अॅना डी आर्मास मुख्य भूमिकेत आहेत. कोविड-१९ मुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते, त्यानंतर निर्मात्यांनी तो ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. ‘डीप वॉटर’चा प्रीमियर १८ मार्च २०२२ रोजी हुलू ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला. तसेच हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर देखील उपलब्ध आहे.

विक आणि मेलिंडाच्या नात्यात अनेक चढ-उतार येतात. नवरा जवळ असूनही मेलिंडाचे इतर लोकांशी शारिरीक संबंध असतात. एके दिवशी दोघेही एकत्र एका पार्टीला जातात. तिथे मेलिंडा जो नावाच्या माणसासोबत बराच वेळ घालवते, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटते, पण विक गप्प राहतो.

विक नंतर जो जवळ जातो आणि त्याला सांगतो की त्याने त्याच्या पत्नीबरोबर सेक्स करणाऱ्या सर्वांना कसं मारलं. तो जोला धमकी देतो. पण तरी मेलिंडा जोला घरी बोलावायची. ते दोघेही विकसमोर बेडरूममध्ये वेळ घालवायचे, यामुळे विक खूप दुखावतो आणि शेवटी तो जोला मारतो.

मेलिंडाचे ज्यांच्याशी संबंध असतात त्या सर्वांना विक मारतो. जेव्हा इतके खून होतात तेव्हा मेलिंडाला संशय येतो की तिचा नवराच या सर्वांचे खून करतोय, पण तरी दोघांमधील प्रेम कमी होत नाही. मेलिंडा तिचा बालपणीचा मित्र टोनीसोबत संबंध ठेवते आणि विकला सांगते की टोनी तिचा पहिला बॉयफ्रेंड होता. हे ऐकून विक अस्वस्थ होतो आणि टोनीलाही मारतो.

इतक्या जबरदस्त ट्विस्टनी भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. विक इतके खून करतो तर तो पोलिसांच्या तावडीत सापडणार का? मेलिंडा विकवर प्रेम असूनही अफेअर का करते? तिचं खरोखर विकवर प्रेम आहे का? की दुसरं काही कारण आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी तुम्ही प्राइम व्हिडीओवर ‘डीप वॉटर’ पाहू शकता.