दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या ‘चमकीला’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. दिवंगत पंजाबी गायक अमरसिंग चमकीला यांच्या जीवनावरील या चित्रपटाची निर्मिती करताना त्यांच्या संघर्षांसह त्यांची सत्यकथा लोकांसमोर मांडायची आहे, असं आधीच ठरवल्याचं इम्तियाज यांनी सांगितलं. हा चित्रपट चमकीला एक सामान्य व्यक्ती असल्यापासून ते ‘एल्विस ऑफ पंजाब’ होईपर्यंतचा प्रवास आणि त्यांच्या खूनाची गोष्ट सांगतो. चमकीला व त्यांच्या पत्नीचे खरे फोटो वापरून, अगदी ज्या ठिकाणी जे घडलं होतं त्याठिकाणीच ते सीन शूट करून वास्तव मांडण्याचा प्रयत्न सिनेमात करण्यात आलाय.

या चित्रपटात चमकीलांचा प्रवास दाखवत असताना त्यांच्या जातीचा उल्लेखही वारंवार येतो. यश आणि प्रसिद्धी मिळवूनही चमकीलांच्या जीवनावर जातीचा कसा परिणाम झाला, हे चित्रपटात दाखण्यात आलं आहे. अरिजित सिंहने गायलेलं ‘विदा करो’ हे गाणं एक दलित शीख म्हणून चमकिलाचा संघर्ष लोकांसमोर मांडतं. चमकीलाच्या जातीचा उल्लेख वारंवार चित्रपटात येतो, त्याबाबत इम्तियाज अलींनी प्रतिक्रिया दिली आहे. चमकीला एका वंचित जातीतून यायचे त्यामुळे त्यांच्या झालेल्या नुकसानाबद्दल बोलणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
banned films because of bold scenes
बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Mohan Wagh Award for Best Theatre Production for Chinmay Mandlekar Ghalib Drama
“महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांच्या DNA मध्ये तीन नावं, एक असतं मंगेशकर…”, चिन्मय मांडलेकरचं विधान
Dhruv Rathe and his wife juli
‘ध्रुव राठीचं नाव रशीद, पत्नी पाकिस्तानी, दाऊदशी संबंध?’, व्हायरल मेसेजनंतर ध्रुव म्हणाला…
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Amar Singh Chamkila show fee
८० च्या दशकात एका शोसाठी किती मानधन घ्यायचे अमरसिंग चमकीला? रक्कम ऐकून चकित व्हाल
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली

श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”

‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत इम्तियाज म्हणाले, “शहरांमध्ये राहणारे आपण खेड्यात राहणाऱ्या लोकांशी जोडलेलो नाहीत (जिथे जातीवाद आहे), आपल्या देशातील मोठ्या प्रमाणातील लोकांबद्दल काहीच माहीत नाही. त्यांना कोणत्या गोष्टीने फरक पडतो, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांचं नुकसान काय आहे, त्यांच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, या सर्वांवर चर्चा व्हायला हवी. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष कसं करू शकतो? देशातील सर्वजण आपल्यासारखेच इंग्रजी बोलत आहेत, असं म्हणून आपण स्वतःला मूर्ख बनवणार आहोत का? उत्तर आहे- नाही.”

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

या चित्रपटात चमकीला जनतेची सेवा करणारे दिसतात, स्टार नाही, याबद्दल इम्तियाज म्हणाले, “ते खूप नम्र होते, त्यांनी कधीच कोणतेही नखरे दाखवले नाही. ते वंचित पार्श्वभूमीतून आले होते, कोणीही त्यांना जे करायला सांगायचं ते करण्यास ते नेहमी तयार असायचे, त्यामुळेच त्यांनी आपला जीव गमावला कारण ते कोणालाही नाही म्हणू शकले नाही.”

२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

“कधीकधी चित्रपट निर्मात्यांना या देशातील खऱ्या समस्यांबद्दल बोलण्याची परवानगी असायला हवी. चमकीला ज्या वंचित पार्श्वभूमीतून आले होते, ते चित्रपट पाहिल्यांनतर प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्याचा मला आनंद झालाय. कारण जर मी त्यांच्या जीवनावर चित्रपट करत असेन तर त्याचं सर्वात मोठं नुकसान कोणत्या गोष्टीने झालं हेही मला दाखवावं लागेल. लोक सामाजिक वर्ग आणि वंशासारख्या गोष्टीवरून तुमच्याबद्दल मत तयार करतात. त्याचा निषेध करण्यासाठी तुम्ही हा प्रकार अस्तित्वातच नाही असं ढोंग करू नये,” असं इम्तियाज म्हणाले.

‘चमकीला’ चित्रपट १२ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. यात दिलजीत दोसांझची मुख्य भूमिका असून त्यांची पत्नी अमरजोतची भूमिका परिणीती चोप्राने केली आहे.