अभिनेत्री सुश्मिता सेनची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘ताली’ या वेबसीरिजला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. ही वेबसीरिज तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर आधारित आहे. या वेबसीरिजद्वारे तृतीयपंथींयांचा संघर्ष उलगडण्यात आला. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशीने तृतीयपंथींयांचं पात्र साकारले आहे. नुकतंच त्याच्या या भूमिकेबद्दल अभिनेत्री सखी गोखलेची प्रतिक्रिया कशी होती, याबद्दल सुव्रतने खुलासा केला आहे.

सुश्मिता सेनच्या ‘ताली’ या वेबसीरीजमध्ये अनेक मराठी कलाकार झळकले होते. या वेबसीरिजमध्ये अभिनेता सुव्रत जोशीने तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्या दोघांनाही ‘ताली’ या वेबसीरिजबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुव्रतसह सखीनेही प्रतिक्रिया दिली
आणखी वाचा : “…बस इतकेच”, सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, म्हणाला “रवी जाधव तुझ्या…”

“ताली ही वेबसीरिज पाहिल्यानंतर आणि त्यात सुव्रतला त्या लूकमध्ये पाहिल्यानंतर सखीची प्रतिक्रिया फारच मजेशीर होती. आम्ही ताली वेबसीरिज पाहायला एकत्र बसलो होतो. साधारण तिसऱ्या चौथ्या भागानंतर माझा रोल जास्त दिसायला लागतो. तिसरा भाग जेव्हा सुरु होतो, त्यात मी जेव्हा येतो, तेव्हा सखी पटकन उठून बसली. आधी ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून ती सीरिज बघत होती.

त्यानंतर जेव्हा माझी भूमिका सुरु झाली, तेव्हा सखी जेवढी आनंदी, गोड अशी होती. त्यानंतरची सखी ही पूर्ण डोळ्याचं काजळं उतरलंय, रडतेय, काय तरी भंयकर प्रसंग घडलं आहे, अशी होती. त्यानंतर ती मला म्हणाली, “मला नाही आवडतं हे तुला अशा भूमिका देतात. तुला मारलंय, तुला लागलंय.” त्यावर मी तिला “अगं तू अभिनेत्री आहेस ना, बरं तुला माहिती आहे तरीही…”. पण तिची प्रतिक्रिया फारच बोलकी होती”, असे सुव्रतने यावेळी सांगितले.

आणखी वाचा : तृतीयपंथी विशिष्ट पद्धतीने टाळी का वाजवतात? गौरी सावंत यांनी सांगितले खरे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे सखी गोखलेने तिच्या प्रतिक्रियेबद्दल भाष्य केले. “सुव्रत जर एखाद्या चित्रपटात काम करत असेल तर मला त्याच्याबद्दल त्याच्याकडून ऐकायला अजिबात आवडत नाही. मला थेट त्याची ती भूमिका पाहायला आवडते. ताली ही वेबसीरिज तो करतोय, त्याची लूक टेस्ट वैगरे या गोष्टींचा मला अंदाज होता. जर त्याने स्त्री पात्र साकारलं असतं तर त्याला ते फार सोपं गेलं असतं. कारण त्याच्या आजूबाजूला खूप स्त्रिया आहेत. पण जेव्हा तुम्ही तृतीयपंथीयांची भूमिका करता तेव्हा तुम्हाला स्त्री-पुरुष या दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या असतात. त्याबरोबरच तुम्हाला आदराने ते पात्र साकारायचं असतं. त्यामुळे हे पूर्णपणे त्याचं यश आहे. मला सुव्रतचं हे काम सर्वात जास्त आवडलंय. त्याने त्याचे हे काम मनापासून केलंय. माझ्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे”, असे सखीने यावेळी म्हटले.