अभिनेत्री मलायका अरोरा सध्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या रिअलिटी शोमुळे बरीच चर्चेत आहे. या शोमध्ये मलायकाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत. अरजाब खानपासून घटस्फोट, अर्जुन कपूरशी रिलेशनशिप आणि ट्रोलिंग या सगळ्यावरच ती या शोमध्ये स्पष्ट भूमिका मांडताना दिसली. त्यानंतर आता मलायकाचा मुलगा अरहान खान या शोमध्ये आई आणि मावशीबद्दल बोलताना दिसणार आहे.

अरहानने ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ शोमध्ये मावशी अमृता अरोराशी असलेल्या बॉन्डिंगबद्दल सांगितलं. अरहानचं त्याच्या मावशीबरोबर खूपच खास बॉन्डिंग असल्याचं त्याच्या बोलण्यातून जाणवतं. अरहान खानने मावशी अमृता अरोराबद्दल बोलताना आई मलायकाबद्दलही मोठं वक्तव्य केलं आहे.

आणखी वाचा- “या वयातही अनेकदा …” ४९ वर्षीय मलायका अरोराला सतावतेय ही भीती

अरहान म्हणाला, “मी अमूसाठी पक्षपाती आहे. ती तुझ्या (मलायका) जागी येण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते. ती माझ्यासाठी दुसरी आईच आहे. पण आता ती तुझी जागा घेत आहे.” आता अरहानच्या या वक्तव्यावर मलायकाची काय प्रतिक्रिया असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मलायका आणि अमृता अरोरा या बहिणींची जोडी नेहमीच बी-टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरते. अनेकदा सोशल मीडियावर त्या सिबलिंग गोल्स देतानाही दिसतात.

आणखी वाचा-“तुम्ही काय तिचे…” मलायका अरोराला ट्रोल करणाऱ्यांना भारती सिंगचं सडेतोड उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांचा २० वर्षांचा मुलगा अरहान खानला ते दोघंही एकत्र सांभाळतात. त्यांची प्रत्येक जबाबदारी त्यांनी वाटून घेतली आहे. अरहान खान सध्या अमेरिकेत फिल्ममेकिंगचा अभ्यास करत आहे. अरहानने या शोमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर मात्र तो आईपेक्षा मावशीबरोबर खूप चांगला बॉन्ड शेअर करत असल्याचं दिसून येतं.