प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने आपल्या यूझर्सच्या वापराचा डेटा आणि सर्वाधिक पाहिलेले चित्रपट आणि वेब सिरीज उघड यांची माहिती दिलेली आहे. हा प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या लोकांनी कोणता कंटेंट सर्वाधिक पाहिला हे या डेटामधून स्पष्ट होत आहे. नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या या यादीत तब्बल ४०० चित्रपट आणि वेबसीरिजची नावं आहेत आणि यात फक्त एका भारतीय वेबसीरिजला जागा पटकावता आली आहे.

‘व्हाट वी वॉच्ड ए नेटफ्लिक्स एंगेजमेंट रिपोर्ट’च्या आधारे नेटफ्लिक्सने ही यादी जाहीर केली आहे. या यादीत जानेवारी २०२३ ते जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आणि वेबसीरिज जास्त पाहिल्या गेल्या आहेत. याच यादीत एकमेव भारतीय सीरिज ‘राणा नायडू’चा समावेश आहे. या सीरिजमध्ये व्यंकटेश आणि राणा दगुग्बाती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सर्वाधिक पाहिलेल्या सीरिजच्या यादीत हीच एकमेव भारतीत सीरिज आहे.

आणखी वाचा : पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी? अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण जाणून घ्या

‘राणा नायडू’ ही सीरिज निर्मात्यांनी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केली होती. या सीरिज पहिली गेल्याचे एकूण तास मोजायचे झाले तर एकूण ४,६३,००,००० तास होतील. बोल्ड कंटेंटमुळे या वेब सीरिजवर टीकाही झाली होती. त्यात खूप शिवीगाळ आणि बोल्ड सीन्स पाहायला मिळाले होते. नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पहिल्या जाणाऱ्या १००० चित्रपट आणि वेबसीरिजच्या यादीत नऊ भारतीय कलाकृतींचादेखील समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या यादीत यामी गौतमचा ‘चोर निकलके भागा’, सिद्धार्थ मल्होत्रा व रश्मिका मंदान्नाचा ‘मिशन मजनू’, राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’, रणबीर व श्रद्धा कपूरचा ‘तू झुठी मै मक्कार’, अन् कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ या चित्रपटांचा समावेश आहे. याबरोबरच ‘क्लास’ या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनचंही नाव या यादीत आहे. तसेच नेटफ्लिक्सने दिलेल्या या रिपोर्टमध्ये अग्रस्थानी ‘द नाइट एजंट’ ही सीरिज आहे. २३ मार्चला प्रदर्शित झालेली ही सीरिज नेटफ्लिक्सची सर्वाधिल पाहिली गेलेली सीरिज आहे.