scorecardresearch

Premium

The Railway Men Trailer: “जीव घेणाऱ्याला शिक्षा नाही अन् जीव वाचवणाऱ्याला…” बहुचर्चित ‘द रेल्वे मेन’चा ट्रेलर प्रदर्शित

चार भागांच्या या मिनी सीरिजचा काळजाचा ठोका चुकवणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘यश राज फिल्म्स’ व ‘नेटफ्लिक्स’ या दोन्ही निर्मात्यांनी एकत्रितपणे हा प्रोजेक्ट सादर केला आहे

the-railway-men-trailer
फोटो : आयएमडीबी

The Railway Men Trailer: २ डिसेंबर १९८४ रोजी भोपाळमध्ये एक भयानक घटना घडली, ज्याच्या जखमा ३९ वर्षांनंतर अजूनही भरल्या नाहीत. ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत हजारो लोकांचा बळी गेला, जे वाचले त्यापैकी अनेक अंध झाले तर अनेक अपंग झाले. तो अपघात आठवला की आजही कित्येक लोक चळाचळा कापतात. ‘भोपाळ गॅस गळती’ या दुर्घटनेमागे कित्येक कहाण्या दडलेल्या आहेत. आता आणखी एक कहाणी ‘द रेल्वे मेन’ या वेबसीरिजच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे.

चार भागांच्या या मिनी सीरिजचा काळजाचा ठोका चुकवणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘यश राज फिल्म्स’ व ‘नेटफ्लिक्स’ या दोन्ही निर्मात्यांनी एकत्रितपणे हा प्रोजेक्ट सादर केला आहे. ‘द रेल्वे मेनच्या ट्रेलरमध्ये भोपाळ रेल्वे स्टेशनवर वेगवेगळी कामं करणारी चार लोक दाखवली आहेत. अन् यानंतर कारखान्यात झालेल्या गॅस गळतीमुळे त्यांच्या कामात आलेला आमूलाग्र बदल आणि यामुळे त्यांच्यावर आलेली संकटे आणि इतरांना वाचवण्यासाठी त्यांची चाललेली धडपड पाहायला मिळत आहे.

netflix documentry on sheena bora
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार्‍या इंद्राणी मुखर्जी- शीना बोरा माहितीपटाला स्थगिती देण्यामागे नेमके कारण काय?
vikrantmassey
“आमच्याकडे प्लॅस्टिकच्या खुर्च्या…”, घरी जेवायला आलेल्या मित्रांनी विक्रांत मेस्सीला दिला आयुष्यातील सर्वात मोठा धडा
Transfer of 40 people including police inspector in traffic cell in case of extortion in Shilpata
शिळफाटा येथील वसूलीप्रकरणी वाहतुक कक्षातील पोलीस निरीक्षकासह ४० जणांची बदली
closing bell sensex down 523 points nifty ends below 21650
चढ्या मूल्यांकनावर निर्देशांकांचा टिकाव आव्हानात्मक; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ची पाच शतकी घसरण 

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर भाईजानच्या ‘टायगर ३’ला टक्कर देणार दोन बहुचर्चित मराठी चित्रपट; कोणता चित्रपट मारणार बाजी?

या ट्रेलरमध्ये ४ वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं या दुर्घटनेच्यावेळी नेमकं कशारीतीने लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात त्याची झलक पाहायला मिळाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल यांचे सुपुत्र शिव रवैल या सीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहेत. ‘द रेल्वे मेन’ची निर्मिती YRF एंटरटेनमेंट व नेटफ्लिक्स यांनी एकत्रित येऊन केली आहे तर याची कथा आयुष गुप्ता यांनी लिहिली आहे.

भोपाळमधील युनियन कार्बाइड कंपनीच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली होती, ज्यामुळे १५ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच घटनेवर ही सीरिज बेतलेली आहे. १८ नोव्हेंबरपासून ही सीरिज जगभरात सर्वत्र नेटफ्लिक्सच्या माध्यमातून पाहता येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Netflix webseries on bhopal gas leak the railway men trailer out now avn

First published on: 06-11-2023 at 17:38 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×