‘अनुजा’ या लघुपटाला (शॉर्टफिल्म) ऑस्कर २०२५ च्या नामांकनात स्थान मिळाल्यानंतर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता हा लघुपट तुम्ही घरी बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. हा लघुपट पुढील महिन्यात नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये सजदा पठाण आणि अनन्या शानबाग यांनी दोन बहिणींच्या भूमिका साकारल्या आहेत.

‘अनुजा’ या लघुपटाची मिंडी कलिंग, प्रियंका चोप्रा यांच्या Purple Pebble Pictures आणि ऑस्कर विजेती गुनीत मोंगा यांच्या Sikhya Entertainment ने संयुक्तरित्या निर्मिती केली आहे.

बुधवारी (२९ जानेवारी २०२५) संध्याकाळी नेटफ्लिक्स इंडियाच्या ऑफिशियल सोशल मीडिया हँडल वरून ‘अनुजा’ चा ट्रेलर शेअर करण्यात आला. “ही आहे आशेची कहाणी, ‘ऑस्कर २०२५’ साठी नामांकन मिळालेली ही शॉर्ट फिल्म ५ फेब्रुवारी २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर येत आहे.” असे कॅप्शन देऊन ट्रेलर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.

ऑस्करमध्ये ‘अनुजा’चा कोणत्या शॉर्ट फिल्मशी होणार सामना?

एडम जे ग्रेव्स दिग्दर्शित ‘अनुजा’ या शॉर्टफिल्मला ‘ऑस्कर २०२५’ च्या लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत स्थान मिळाले आहे. ‘A Lien’, ‘I Am Not A Robot’, ‘The Last Ranger’ आणि ‘The Man Who Could Not Remain Silent’ या शॉर्ट फिल्मशी सामना होणार आहे.

गुनीत मोंगा ‘अनुजा’ या शॉर्ट फिल्मच्या कार्यकारी निर्मात्या आहेत, तर मिंडी कलिंग या लघुपटाच्या निर्मात्या आहेत. नुकतेच प्रियंका चोप्रा जोनासनेही कार्यकारी निर्माती म्हणून या चित्रपटात सहभाग घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्कर २०२५ कधी होणार?

भारतात तुम्ही ऑस्कर ३ मार्च २०२६ रोजी पहाटे ५:३० वाजता पाहू शकता. हा सोहळा तुम्ही ऑस्करच्या अधिकृत YouTube चॅनेलवर लाइव्ह पाहू शकता. तसेच X (पूर्वीचे ट्विटर) वर त्यासंबंधी अपडेट्स मिळतील.