बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाची चांगलीच चर्चा सुरू आहे. दिवसेंदिवस या शोची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात फलक नाझ बाहेर पडली. असे असतानाच लगेच या शोमधून दुसरा सदस्यही बाहेर पडल्याचं वृत्त समोर आलं आहे. बिग बॉसच्या ओटीटीच्या दुसऱ्या पर्वातील स्ट्राँग सदस्य म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री, निर्माती पूजा भट्ट काही कारणामुळे घराबाहेर पडली आहे.

हेही वाचा – “पुरुषासारखी दिसतेस” कमेंट पाहून भडकली अर्चना पूरन सिंह; म्हणाली, “कमी वयात…”

‘बॉलीवूड बबल’च्या वृत्तानुसार, बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाच्या लाईव्ह प्रेक्षपणातून पूजा भट्ट घरातून बाहेर पडल्याचं समोर आलं आहे. यामागे वैद्यकीय कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. काही वैद्यकीय चाचण्या आणि त्याचे अहवाल आल्यानंतर पूजा भट्ट पुन्हा घरात प्रवेश करणार आहे. मात्र, याबाबत शोच्या निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा – “१२ वर्षांची असताना थेरपीला पाठवलं,” आमिर खानची लेक इराचा आजारपणाचा अनुभव; म्हणाली, “कुटुंबीयांनी…”

रविवारी (२३ जुलै) झालेल्या वीकेंडच्या वारला अविनाश सचदेव, जैद हदीद आणि फलक नाझ यांच्यापैकी कोणत्या सदस्यांनी हा शो जिंकण्यासाठी कमी योगदान दाखवले आहे? असं सलमान खाननं घरातील इतर सदस्यांना विचारलं होतं. त्यावेळेस घरातील सर्व सदस्यांनी फलक नाझचं नाव घेतलं. त्यामुळे फलक रविवारी या शोमधून बाहेर पडली.

हेही वाचा – “दिग्दर्शक ब्रेस्ट साइज विचारायचे अन्….” शर्लिन चोप्रानं सांगितला धक्कादायक अनुभव

View this post on Instagram

A post shared by Falaq Naazz (@falaqnaazz)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण, आता घरातील स्ट्राँग सदस्य असलेली पूजा भट्टची पुन्हा बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वात एंट्री होते की नाही; किंवा कॉमेडियन सायरस ब्रोचाप्रमाणे ती सुद्धा थेट घराबाहेर होते, हे येत्या काळात समजेल.