अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने ९ मार्चला निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कौशिक यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती. सतीश कौशिक यांच्या निधनानंतरही तुम्हाला त्यांना मोठ्या स्क्रीनवर पाहता येणार आहे. नुकतंच त्यांच्या शेवटच्या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘पॉप कौन (Pop Kaun)’ असे सतीश कौशिक यांच्या शेवटच्या वेबसीरिजचे नाव आहे. नुकतंच या वेबसीरिजच्या ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही एक कॉमेडी वेबसीरिज आहे. ‘पॉप कौन’ या वेबसीरिजची कथा एका मुलाच्या जीवनावर आधारित आहे. हा मुलगा त्याच्या खऱ्या वडिलांच्या शोधात आहे. त्यातच चार वेगवेगळे पुरुष कशाप्रकारे ते त्याचा बाप असल्याचा दावा करत आहेत आणि तो मुलगा कसा गोंधळून जातो, हे यात पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : Video : ‘तारक मेहता…’ मालिकेचे चाहते होते सतीश कौशिक, राजू श्रीवास्तव यांच्याबरोबर सेटवर पोहोचले अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाचा ट्रेलर अनेकांना आवडला आहे. तर अनेकजण हा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सतीश कौशिक यांची झलक पाहून भावूक झाले आहेत. या वेबसीरिजमध्ये कुणाल खेमू, राजपाल यादव, नुपूर सॅनन, जॉनी लीव्हर, सौरभ शुक्ला आणि सतीश कौशिक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. फरहाद सामजी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ही वेबसीरिज येत्या १७ मार्चपासून Disney + Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.