Amaran OTT Release: साई पल्लवी व शिवकार्तिकेयन यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘अमरन’ आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. यंदाच्या सर्वोत्तम तमिळ चित्रपटांपैकी एक असलेला ‘अमरन’ची ओटीटी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात एका लष्करी अधिकाऱ्याचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट एका महिन्यापूर्वी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण आता महिनाभरानंतर तो ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘अमरन’ हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसंदर्भात माहिती समोर आली आहे. ‘अमरन’ चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ५ डिसेंबरपासून प्रेक्षकांना घसबसल्या हा चित्रपट पाहता येईल.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा – टीव्हीवर प्रदर्शित होणार होता ‘आशिकी’ सिनेमा, गाणी हिट झाल्यावर बनवला चित्रपट, बजेट होतं फक्त ‘इतके’ लाख

‘अमरन’ चित्रपटाचे कलेक्शन

‘अमरन’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, या तमिळ चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण ३२२ कोटींची कमाई केली आहे. बऱ्याचदा तमिळ चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर २८ दिवसांनी ओटीटीवर प्रदर्शित केले जातात; मात्र ‘अमरन’ ब्लॉकबस्टर ठरल्याने तो थोडा उशीरा ओटीटीवर रिलीज केला जाणार आहे.

हेही वाचा – माधुरी दीक्षितवर जडला जीव, मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन् तिने…; भारताच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची अधुरी प्रेमकहाणी

राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित ‘अमरन’ हा शिवा आरूर आणि राहुल सिंग यांनी लिहिलेल्या ‘इंडियाज मोस्ट फियरलेस: ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हीरोज’ या पुस्तकातील मेजर मुकुंद वरदराजन यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात मेजर मुकुंद (शिवकार्तिकेयन) आणि त्यांची पत्नी इंदू रेबेका वर्गीस (साई पल्लवी) यांचा प्रवास आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू पाहायला मिळतो.

हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Story img Loader