CRIME THRILLER SOUTH WEBSERIES OTT : बॉलीवूडच्या सिनेमांसह आजकाल दाक्षिणात्य सिनेमांचीही चाहत्यांमध्ये खूप क्रेझ आहे. अल्लू अर्जुन किंवा नागा चैतन्य अभिनीत दाक्षिणात्य चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं आहे. जर तुम्हालाही दाक्षिणात्य सिनेमे आणि वेब सीरिज पाहायला आवडत असतील, तर आम्ही तुम्हाला काही जबरदस्त वेब सीरिजची माहिती देणार आहोत; ज्यात तुम्हाला क्राइम, थ्रिलरचा जबरदस्त डोस मिळेल.

९ अवर्स

२०२२ मध्ये आलेल्या या सीरिजमध्ये मधु शालिनी, प्रीती असरानी, पार्वती निर्बान, तारक रतन, अंकित कोया व ज्वाला कोटी यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेत एका दिवसात तीन बँकांमध्ये एकाच वेळी होणारी लूट दाखवण्यात आली आहे. ‘मनी हाइस्ट’ची आठवण करून देणारी ही सीरिज तुम्ही ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’वर पाहू शकता.

हेही वाचा…OTT वर फ्री आहेत या गाजलेल्या वेब सीरिज, तुम्ही पाहिल्यात का?

केरळ क्राईम फाइल्स

२०२३ मध्ये रिलीज झालेली ही वेब सीरिज प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरली. अहमद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सीरिजची कथा एका खुनाच्या अवतीभोवती फिरते. जर तुम्हाला गुन्हेगारी विश्वावर आधारित मालिका पाहायला आवडत असतील, तर ही सीरिज तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही ही सीरिज ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’वर पाहू शकता.

लॉक्ड

२०२३ मध्ये आलेल्या या सायको थ्रिलर वेब सीरिजमधील अनेक क्षण अंगावर काटा आणणारे आहेत. या सीरिजची कथा एका डॉक्टरशी संबंधित आहे. यातील पात्र पेशाने डॉक्टर असले तरी लोकांचे खून करतो. ही सीरिज तेलुगूमध्ये असून ‘एमएक्स प्लेअर’वर हिंदी डब व्हर्जनमध्येदेखील उपलब्ध आहे.

हेही वाचा…‘OTT क्वीन’ श्रिया पिळगावकरला ‘या’ दिग्दर्शकाबरोबर करायचंय काम, म्हणाली, “आतापर्यंत मी…”

सुजल

सस्पेन्स आणि थ्रिलरचा संगम असणारी तमीळ भाषेतील ही वेब सीरिज ‘प्राइम व्हिडीओ’वर हिंदी डबमध्ये उपलब्ध आहे. एका सिमेंट फॅक्टरीत लागलेल्या आगीपासून तो एका मुलीच्या बेपत्ता होण्याच्या थरारक घटनांपर्यंतची गोष्ट तुम्हाला खिळवून ठेवते. या सीरिजमधील कथेतले ट्विस्ट तुम्हाला नक्कीच चकित करतील.

हेही वाचा…“मानवत मर्डर्सची कथा माझ्या गावाजवळच घडली”; बालपणीच्या भीतीदायक आठवणी सांगत मकरंद अनासपुरे म्हणाले, “आमच्या दैनंदिन जीवनावर… “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धूता

या वेब सीरिजमध्ये प्राची देसाई व नागा चैतन्य यांच्या मुख्य भूमिका आहेत. एका व्यक्तीला भविष्यकाळातील घटना दिसू लागतात आणि त्यातून निर्माण होणारे ट्विस्ट या सीरिजमध्ये दाखविले आहेत. ही थ्रिलर सीरिज तुम्ही ‘प्राइम व्हिडीओ’वर पाहू शकता.