बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची वेब सीरिज ‘आर्या’ बरीच गाजली. आतापर्यंत या वेब सीरिजचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आपल्या शानदार अभिनयाच्या जोरवर सुश्मिताने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच पण तिचं कमबॅकही यशस्वी ठरलं. यानंतर सुश्मिता लवकरच एका नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या वेब सीरिजचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक करणार आहे. विशेष म्हणजे या वेब सीरिजमध्ये सुश्मिता सेन ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘पायपिंग मून’ने दिलेल्या वृत्तानुसार ट्रान्सजेंडर एक्टिविस्ट गौरी सावंतच्या बायोग्राफीवर ही वेब सीरिज आधारलेली आहे. ज्यात सुश्मिता सेन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुश्मिताला या वेब सीरिजची स्क्रिप्ट आवडल्याने तिने लगेचच या भूमिकेसाठी होकार दिला. ‘आर्या’नंतर सुश्मिता सेन या नव्या भूमिकेसाठी खूप उत्साही आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.
आणखी वाचा- Video : एक्स बॉयफ्रेंडशी सुश्मिता सेनची जवळीक, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ललित मोदी कुठे आहेत?”

सुश्मिता सेनने तिच्या इन्स्टाग्रामवर आगमी वेब सीरिज ‘ताली’चा लूक शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं, “ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! या सुंदर व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारण्याचं आणि तिची कथा जगासमोर आणण्याचा भाग्य मला मिळालं यापेक्षा अभिमानास्पद काहीच नाही. मी कृतज्ञ आहे की मला ही संधी मिळाली. इथे आपलं आयुष्य सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. खूप सारं प्रेम.”

आणखी वाचा- “‘आदिपुरुष’मधील रावण तालिबानी…” ‘महाभारता’त दुर्योधन साकारणाऱ्या अभिनेत्याची संतप्त प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या वेब सीरिजवर काम सुरू झालं असून या वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या खांद्यावर असणार आहे. रवी जाधव यांनीही सुश्मिता सेनची इन्स्टाग्राम पोस्ट रिशेअर करत याची माहिती दिली आहे. ही वेब सीरिज वूट सिलेक्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. या वेब सीरिजचे एकूण ६ एपिसोड असणार आहेत आणि त्यातून गौरी सावंतच्या आयुष्यातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर मांडले जाणार आहेत. या वेब सीरिजची निर्मिती अर्जुन सिंग बारान आणि कार्तिक डी निशंदर करत आहेत.