Action Thriller Movies On OTT: वीकेंड सुरू झाला आहे. अनेकांनी त्यांचे वीकेंडचे प्लॅन बनवायला सुरुवात केली असेल. काही लोक पावसात बाहेर फिरायला जाणार असतील, तर काही त्यांच्या कुटुंबासह घरीच राहणार असतील. जर तुम्हीही घरी राहून हा वीकेंड घालवणार असाल, तर आम्ही तुम्हाला एका अॅक्शन थ्रिलर चित्रपटाबद्दल सांगतोय, तो तुम्ही पाहू शकता. हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. १ तास ३४ मिनिटांच्या या चित्रपटाची कथा पाहून तुमचं डोकं चक्रावेल.
या चित्रपटात जबरदस्त ट्विस्ट आहेत. इतकंच नाही तर यातील सस्पेन्स तुम्हाला शेवटपर्यंत हा चित्रपट पाहायला भाग पाडेल. तसेच व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावर पसरणाऱ्या बनावट माहितीपासून सावध राहण्याची गरज कशी आहे, यासंदर्भातील खास मेसेज तुम्हाला या चित्रपटातून मिळेल. काही वेळा सोशल मीडियावरील बनावट पोस्टवर विश्वास ठेवणं किती घातक ठरू शकतं ते यात पाहायला मिळेल. या चित्रपटाचे नाव, तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल आणि त्याला आयएमडीबीवर किती रेटिंग मिळाले आहे, ते जाणून घेऊयात.
काय आहे या चित्रपटाचं नाव?
Stolen on Prime Video: करण तेजपाल दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, शुभम वर्धन आणि मिया मालसेर यांच्यासह अनेक कलाकारांनी विविध भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाचे नाव ‘स्टोलन’ आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. ओटीटीवर या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं.
‘स्टोलन’ चित्रपटाची कथा काय?
‘स्टोलन’ चित्रपटाची कथा राजस्थानमधील एका छोट्या रेल्वे स्टेशनपासून सुरू होते. एक महिला कामगार झुम्पा (मिया मेलझर) तिच्या ५ महिन्यांच्या मुलीसह स्टेशनवर झोपलेली असते. गौतम (अभिषेक बॅनर्जी) त्याचा भाऊ रमन (शुभम वर्धन) याला नेण्यासाठी त्याच स्टेशनवर पोहोचतो. रमनची फ्लाइट चुकली असते आणि त्याला ट्रेनने यावं लागतं. मग एक अज्ञात महिला झुम्पाच्या मुलीचे त्याच स्टेशनवरून अपहरण करते आणि झुम्पा रमनवर संशय घेते. कथेत पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
ओटीटीवर कुठे पाहायचा ‘स्टोलन’ चित्रपट?
स्टोलन चित्रपट ओटीटीवर कुठे पाहता येईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर स्टोलन हा प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. स्टोलनला आयएमडीबीवर ७.५ रेटिंग मिळाले आहे.