अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा ही बी-टाऊनमधील नवी जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तमन्ना आणि विजयने एकमेकांना डेट करत असल्याचे जाहीर झाले होते. लवकरच दोघांचा ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये तमन्नाने विजय वर्माबरोबर अनेक रोमॅंटिक सीन केले आहेत.

हेही वाचा : “माझी ड्रॅगन क्वीन”, सई ताम्हणकरच्या वाढदिवशी बॉयफ्रेंड अनिश जोगने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाला…

विजय वर्माने अलीकडेच ‘लस्ट स्टोरीज २’चे प्रमोशन करताना हा चित्रपट तुमच्या कुटुंबाबरोबर पाहा असा सल्ला दिला आहे. अभिनेत्याचा हा सल्ला ऐकून सोशल मीडिया युजर्स चांगलेच संतप्त झाले आहेत.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरने मागितली चाहत्यांची माफी; वाढदिवसानंतर शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘लस्ट स्टोरीज २’विषयी अभिनेता सांगतो, “यामधील इंटिमेट सीन फॉरवर्ड करण्यापेक्षा तुमच्या कुटुंबाबरोबर एकत्र पाहा. रोमॅंटिक सीन फास्ट फॉरवर्ड करण्याची गरज काय? घाबरून किंवा लाज न बाळगता कुटुंबियांसोबत हा चित्रपट जरूर बघा. तुमचे आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू अगदी सगळ्यांबरोबर बसून पॉपकॉर्नसह या चित्रपटाचा आनंद घ्या.”

हेही वाचा : अमिताभ बच्चन आणि प्रभासच्या बहुचर्चित ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटात साऊथच्या मेगास्टारची एन्ट्री! बिग बी पोस्ट शेअर करीत म्हणाले…

नेटफ्लिक्सने शेअर केलेला विजय वर्माचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेत्याने चित्रपटातील इंटिमेट सीन कुटुंबाबरोबर बघण्याचा सल्ला ऐकून नेटकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “अशा घाणेरड्या सीरिज का बनवता? मनोरंजनाच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न बनवून पैसा कमावणे अत्यंत चुकीचे आहे.”

दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “आधुनिकीकरण म्हणजे आपल्या देशाच्या संस्कृतीला विसरणे, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा अनादर करणे असा होत नाही. आधी तुम्ही स्वत: तुमच्या कुटुंबीयांबरोबर असे इंटिमेट सीन पाहतानाचे व्हिडीओ शेअर करा त्यानंतर जगाला उपदेश द्या…” एकंदर विजय वर्माच्या व्हिडीओवर त्याचा विचित्र सल्ला ऐकून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. याच चित्रपटाचा दुसरा भाग २९ जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तमन्ना भाटिया, विजय वर्मा, नीना गुप्ता, काजोल, मृणाल ठाकूर, अंगद बेदी, कुमुद मिश्री, अमृता सुभाष यांसारखे दिग्गज कलाकार आहेत.