Padmavati Ek Dil Ek Jaan Song : पद्मावती- महारावल रतन सिंहमधील प्रेम दर्शवणारे ‘एक दिल एक जान’ गाणे

राणी पद्मिनी आणि महारावल रतन सिंह यांच्यामधील प्रेम या गाण्यात दिसून येते.

दीपिका पदुकोण, शाहिद कपूर

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटातील ‘घुमर’ गाण्यानंतर आता ‘एक दिल एक जान’ गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. राणी पद्मिनी आणि महारावल रतन सिंह यांच्यामधील प्रेम या गाण्यात दिसून येते.

PHOTO: आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज

‘एक दिल एक जान’ गाण्याला खुद्द भन्साळी यांनी संगीत दिले असून गायक शिवम पाठकने ते गायले आहे. तर गीतकार ए एम तुराझने ते लिहिले आहे. महारावल रतन सिंह आणि पद्मावती यांच्यातील प्रेम या गाण्यात दाखवण्यात आलंय. हे संपूर्ण गाणे पद्मावतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि महारावल रतन सिंहच्या भूमिकेतील शाहिद कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. ट्रेलरप्रमाणेच हे गाणेही भन्साळींच्या चित्रपटातील भव्यता दर्शवते.

Video : छोट्या रणबीर-करिनाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘सो क्यूट’

भन्साळी हे उत्कृट संगीत दिग्दर्शक असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेय. याआधी त्यांनी ‘बाजीराव मस्तानी’ (२०१५), ‘राम लीला’ (२०१३) आणि ‘गुझारिश’ (२०१०) या चित्रपटांनाही संगीत दिले आहे. येत्या १ डिसेंबरला प्रेक्षकांना भन्साळींच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाची भव्यता अनुभवता येणार आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Padmavati ek dil ek jaan video song deepika padukone shahid kapoor sanjay leela bhansali