बी-टाऊनमधील कलाकार मंडळी असो वा स्टारकिड्स त्यांचं खाजगी आयुष्य चर्चेचा विषय ठरतं. कोणीही कितीही आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न केला तरी विविध चर्चा या रंगतात. सेलिब्रिटी मंडळी आपलं नातं हे गुपितचं राहिलं पाहिजे यासाठी कित्येक प्रयत्न करतात. असाच प्रयत्न सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खाननेसुद्धा केला होता. इब्राहिम अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलकला डेट करत असल्याचं बोललं जात होतं. अशामध्येच या दोघांचा एकत्रित फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये पलक चेहरा लपवताना दिसली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आलं आहे.

इब्राहिम आणि पलकचा एकत्रित व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पलक एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसत आहे. पलक तिच्या कारमध्ये बसताच पाठोपाठ इब्राहिम देखील त्याच्या मित्रांबरोबर त्याच रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसत आहे. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा नव्या चर्चांनी जोर धरला आहे.

आणखी वाचा – वयाच्या ६०व्या वर्षी राम गोपाल वर्मांना असं वागणं शोभतं का? अभिनेत्रीसोबतचे विचित्र फोटो, व्हिडीओ VIRAL

पलकने पांढऱ्या रंगाचा टॉप, हिरव्या रंगाचा स्कर्ट आणि जॅकेट परिधान केला असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तर इब्राहिमने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. पण यावेळी पलकने तिचा चेहरा न लपवता कॅमेऱ्याकडे हसत पाहिलं आहे. इब्राहिम-पलकच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला असला तरी याबाबत दोघांनीही सध्यातरी मौन पाळलं आहे.

आणखी वाचा – “त्याने ‘द कश्मीर फाइल्स’ची खोटी स्तुती केली”, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे अक्षय कुमारवर गंभीर आरोप

एका मुलाखतीदरम्यान पलकला इब्राहिमसोबत असलेल्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली, “आमच्यामध्ये उत्तम मैत्री आहे. लोकं जे बोलतात त्या निव्वळ अफवा आहेत. म्हणूनच मी या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. आम्ही आमच्या मित्र-मैत्रिंणींबरोबर बाहेर गेलो होतो. पण माझे आणि इब्राहिमचेच फोटो व्हायरल झाले. त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.” इब्राहिमसोबत फक्त मैत्री असल्याचं पलकने त्यावेळी स्पष्ट केलं होतं.