छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘पांड्या स्टोर.’ या मालिकेत काम करणारा अभिनेता अक्षय खरोडियाने १९ जून रोजी गर्लफ्रेंड दिव्या पुनेठाशी लग्न केले. आज त्यांच्या लग्नाला एक महिना झाला आहे. दरम्यान अक्षयने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. ही पोस्टपाहून अक्षय आणि दिव्या यांच्या नात्यात फूट पडली असल्याचे म्हटले जात आहे.

नुकताच अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने पोस्टमध्ये ‘एक मोहब्बत थी’ असे म्हटले आहे. त्यासोबतच हॅशटॅगचा वापर करत ‘Heartbroken’ असे म्हटले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टवरुन लग्नाच्या महिनाभरातच अक्षय आणि दिव्या यांच्या नात्यात फूट तर पडली नाही ना असे म्हटले जात आहे.

pandya store, Akshay Kharodia Marriage In Trouble, akshay kharodia divya punetha marriage,

अक्षयने यावर अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान अक्षयने दिव्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे देखील बंद केले आहे. सध्या अक्षयची ही पोस्ट चर्चेत आहे.

१९ जून रोजी अक्षयने डेहराडून येथे दिव्याशी लग्न केले. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांच्या लग्नाला केवळ १० लोकांनी हजेरी लावली होती. लग्नातील अक्षय आणि दिव्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दिव्या ही एक डॉक्टर आहे. पण आता त्यांच्यामध्ये वाद सुरु असल्याचे म्हटले जात आहे.