Meri Pyaari Bindu : परिणीतीच्या आवाजातील ‘माना के हम यार नही’ गाणे प्रदर्शित

परिणीतीची बहिणीच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल सुरु आहे.

Parineeti Chopra ,
अभिनेत्री परिणीती चोप्रा

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा बहिण प्रियांकाचे अनुकरण करताना दिसते. प्रियांकाच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये अभिनयाचा बाज दाखवून दिल्यानंतर परिणीतीने आता तिच्याप्रमाणे गाणे देखील गायले आहे. ‘मेरी प्यारी बिंदू’ या आगामी चित्रपटातून परिणीती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील ‘माना की हम यार नही..’ हे गाणे परिणीतीने गायले आहे. आयुषमान खुरानासोबत ती स्क्रिन शेअर करताना दिसेल. यापूर्वी प्रियांका चोप्राने ‘माय सिटी’ नावाच्या अल्बमसाठी गाणे गाऊन आपल्यातील कला दाखवून दिली होती. त्यामुळे आधी अभिनय आणि आता गायन यामुळे परिणीती बहिणीच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल करत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

परिणीतीच्या पहिल्याच गाण्यावर बॉलिवू़ड कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या आगामी चित्रपटातील तिचा सहकारी आयुषमान खुराना याने हटके अंदाजात गाण्याचे कौतुक केले. ‘परिणीतीचा आवाज माझ्या कादंबरीतील अभिनेत्रीसारखा आहे.’ असे ट्विट करत त्याने परिणीतीला शुभेच्छा दिल्या. आलिया भट्टने देखील परिणीतीच्या गाण्याचे कौतुक केले. तिने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. बॉलिवूड वर्तुळातून परिणीतीवर शुभेच्छांचा वर्षाव होत असाताना प्रियांकाने वडिलांना तुझा अभिमान वाटेल, अशा शब्दांत परिणीतीचे कौतुक केले.

यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट यांनी स्वत:च्या आवाजात गाणी गायली आहेत. अभिनयासोबत गायिकेच्या भूमिकेतही या अभिनेत्रींना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या अभिनेत्रींच्या गाण्याला मिळालेल्या प्रसिद्धीप्रमाणे परिणीतीच्या गाण्याला पसंती मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Parineeti chopra debuts as singer with meri pyaari bindu

ताज्या बातम्या