युवापिढीमध्ये वेब सेन्सेशन म्हणून ओखळला जाणारा अमेय वाघ अखेर लग्नाच्या बेडीत अडकला आहे. रविवारी अमेयने बालमैत्रिण आणि प्रेयसी साजिरी देशपांडे हिच्याशी पुण्यात विवाह केला. अमेयचे लग्न पुण्यातील श्रृतिमंगल कार्यालयात पार पडले. अमेय आणि साजिरीला आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी यावेळी अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. लग्नात अमेय आणि साजिरी या दोघांची जोडी खूप सुंदर दिसत होती. साजिरीने लग्नावेळी नववारी साडी नेसली होती तर अमेयने शेरवानी घालून डोक्यावर फेटा बांधला होता.

PHOTO : असा रंगला अमेयचा संगीत सोहळा

Rainy Weather, unseasonal rain, Delights Wildlife, Tadoba Andhari Tiger Project, Bears Spotted Carrying Cubs, Bears Spotted Carrying Cubs on Their Backs, marathi news, tadoba news, andhari news, viral video,
VIDEO: अस्वलाने पिल्लाला बसवले पाठीवर आणि घडवली जंगलाची सैर…हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा बघाच….
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
exam burden on children marathi news
सांदीत सापडलेले… : खरी परीक्षा!

अमेय वाघच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी, सुमित राघवन, ललित प्रभाकर, जितेंद्र जोशी, पर्ण पेठे, आलोक राजवाडे, निपुण धर्माधिकारी या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. याबरोबरच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील सखी गोखले, स्वानंदी टिकेकर, पूजा ठोंबरे यांनीदेखील सोहळ्याला उपस्थित लावली होती. अमेयसोबत नुकतीच ‘मुरांबा’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मिथिला पारकरदेखील तिच्या मित्राच्या लग्नाला उपस्थित होती. आपल्या लाडक्या मित्राच्या लग्नाला सर्वांनीच बरीच धम्माल मस्ती केल्याचे दिसते. या लग्नसोहळ्यातील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

amey-wagh-wedding-02

लग्नविधी पूर्ण करताना अमेय आणि साजिरी

amey-wagh-wedding-01

निळ्या रंगाची नववारी, हातात हिरवा चुडा, नाकात नथ आणि महाराष्ट्रीय पद्धतीचे दागिने यामुळे साजिरीचे सौंदर्य अधिक खुलून आल्याचे दिसते.

amey-wagh-wedding-06

‘ले बेटा सेल्फी लेले रे’ मुमेन्ट

amey-wagh-wedding-08

‘मुरांबा’मधील अमेयची सहकलाकार मिथिला पालकर आणि त्याची पत्नी साजिरी देशपांडे

amey-wagh-wedding-07

‘कास्टिंग काउच विथ निपुण अॅण्ड अमेय’मधील निपुण धर्माधिकारी आणि मिथिला पालकर

amey-wagh-wedding-04

अमेय आणि साजिरीसह सेल्फीसाठी पोज देताना सारंग, पर्ण पेठे, आलोक राजवाडे

amey-wagh-wedding-05

अमेयचे मित्रमंडळ

amey-wagh-wedding-03

अमेय वाघ आणि साजिरी देशपांडे