‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस’ चित्रपटातील अभिनयासाठी प्रसिध्द असलेला हॉलिवूड अभिनेता पॉल वॉकरचे सात महिन्यांपूर्वी एका कार अपघातात निधन झाले. वडिलांच्या अपघाती मृत्यूने पॉल वॉकरची मुलगी मेडो खूप व्यतिथ झाली होती. तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. आता ती धक्क्यातून सावरलेली असून, तिने इन्स्टाग्रामवर स्वत:चे छायाचित्र प्रसिध्द केले आहे. वडिलांच्या अपघाती मृत्यूच्या दुखातून आपण सावरल्याचे दर्शविण्यासाठी १५ वर्षीय मेडोने सदर माध्यमाद्वारे चाहत्यांशी संपर्क साधल्याचे ‘हॅलो’ मासिकाने म्हटले आहे. ‘ग्लॅड टू बी हॅपी’ असा संदेश असलेल्या ह्या छायाचित्रात ती आनंदी दिसते. प्रिंटेड बिकनी आणि डोक्यावर गॉगल असलेली मेडो खचितच सुंदर दिसते. चाहत्यांनी तिच्यावर शुभसंदेशाचा वर्षाव केला आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच ती सुंदर दिसत असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मेडोने इन्स्टाग्रामवर खाते उघडले असून, येथे स्व:तचे शेअर केलेले हे तिचे तिसरे छायाचित्र आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2014 रोजी प्रकाशित
पॉल वॉकरच्या मुलीचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर
'फास्ट अॅण्ड फ्युरिअस' चित्रपटातील अभिनयासाठी प्रसिध्द असलेला हॉलिवूड अभिनेता पॉल वॉकरचे सात महिन्यांपूर्वी एका कार अपघातात निधन झाले.

First published on: 08-07-2014 at 05:23 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paul walkers daughter shares picture on instagram