काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तनाचा आरोप केला. अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे असे ट्विट पायलने केले होते. पायलने वर्सोवा पोलिस ठाण्यात अनुराग विरोधात तक्रार देखील दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अनुरागची चौकशी केली. पण गेल्या चार महिन्यांपासून सुरु असलेल्या चौकशीवर पायलने नाराजी व्यक्त करत मुंबई पोलिसांना संतप्त सवाल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पायलने एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून तिने संताप व्यक्त केला आहे. ‘आता चार महिने झाले आहेत आणि अनुराग विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मी मेल्यानंतर यावर कारवाई होणार आहे का?’ या आशयाचे ट्विट पायलने केले आहे.

त्यानंतर तिने आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने मुंबई पोलिसांना टॅग केले आहे. ‘बरेच दिवस उलटले आहेत पण मुंबई पोलिसांनी त्यांचे काम केलेले नाही. मी तुम्हाला विनंती करते. हे प्रकरण महिलांशी संबंधीत आहे आणि आपण कशा प्रकारचे उदाहरण लोकांसमोर ठेवत आहोत याचा विचार केला पाहिजे’ या आशयाचे ट्विट पायलने केले आहे.

आणखी वाचा- अनुराग कश्यपवर आरोप करणारी पायल घोष आहे तरी कोण?

पायल घोषने केलेला आरोप?
“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असे ट्विट पायलने केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Payal ghosh is not happy with mumbai police action against anurag kashyap avb
First published on: 22-12-2020 at 15:03 IST