‘जेव्हा मोराच्या डोळ्यातून अश्रू निघतात तेव्हाच लांडोर गर्भवती होऊन पिल्ल जन्माला येतात’ असे नुकतेच न्यायाधीश महेशचंद्र शर्मा यांनी म्हटले. त्यांचे हे वक्तव्य कॅमेऱ्यात कैद झाल्यावर अगदी थोड्याच वेळात त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. न्यायाधीश महेशचंद्र शर्मा हे बुधवारी निवृत्त झाले. शर्मा यांनी गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात येण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले. १४५ पानांच्या आदेशावर गायीबरोबरच त्यांनी मोरावर देखील टिप्पणी केली. फक्त सर्वसामान्य नागरीकच नाही तर बॉलिवूड कलाकारांनीही यावर आपली मतं मांडली आहेत.

सलमानच्या एक्स मॅनेजरची अक्षयकडे धाव

ट्विंकल खन्ना सध्या फ्रान्समध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पण तिला भारताची फार आठवण येतेय. ‘मोर सेक्स करू शकत नाहीत, कारण जंगलात मोर नाचला पण कोणी पाहिला?’ असे विनोदी ट्विट तिने केले. पण एवढंच करून ती थांबली नाही तर सोशल मीडियावर आलेले काही मजेशीर विनोदही तिने रिट्विट केले. यात राजेश खन्ना यांच्या आनंद सिनेमातला प्रसिद्ध संवाद ‘आय हेट टिअर्स’ वापरून शर्मा यांची खिल्ली उडवण्यात आली होती.

सोनाक्षी सिन्हानेही ट्विटरवर आपले मत मांडत म्हटले की, ‘कोणीतरी असं म्हटलं की मोराच्या अश्रूंनी लांडोर गरोदर होते. वॉव… मस्तच..’ टेलिव्हीजन अभिनेत्री श्रुती सेठनेही एकामोगामाग एक ट्विट करत आपले मत मांडले. ‘सध्या मी पिण्यासाठी काही अश्रू शोधतेय. या माणसाला न्यायाधीश कोणी बनवले.’ तिने असेही लिहिले की, ‘त्या वाहिनीच्या रिपोर्टरचे खूप अभिनंदन…. जिने हे ऐकत असतानाही चेहऱ्यावरचे हावभाव बदलू दिले नाहीत.’