माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा काल वाढदिवस होता. मात्र, यावर्षी कोणतीही पार्टी किंवा गाजावाजा न करता अगदी साधेपणाने या अभिनेत्रीने तिचा वाढदिवस साजरा केला. ४५व्या वर्षात पदार्पण केलेल्या ऐश्वर्याने मुलगी आराध्या बच्चनसह सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

वाचा : 2.0 poster घाबरलात ना, घाबरायलाच पाहिजे!

‘फॅनी खान’ या आगामी चित्रपटात झळकणाऱ्या ऐश्वर्यावर तिच्या चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान, ऐश्वर्या कुठेही गेली तर ती आराध्याला स्वतःपासून दूर राहू देत नाही. एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण असो वा कोणताही कार्यक्रम ही सुंदरी आपल्या लेकीला घेऊन सर्वत्र फिरताना दिसते. तसेच, ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघेही आपल्या मुलीला माध्यमांपासून दूर ठेवत नाहीत.

वाचा : तुझ्यासारख्या महिलेला काय बोलावे, लिअँडर पेसच्या वकिलाचा रिया पिल्लईवर निशाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या पाच वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिली. त्यानंतर तिने ‘जज्बा’ चित्रपटातून पुनरागमन केले. अपहरण झालेल्या आपल्या मुलीची सुटका करणाऱ्या धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ आईच्या भूमिकेत ती यात दिसली. त्यानंतर ‘सरबजीत’ चित्रपटात पाकिस्तानमधील तुरुगांत असलेल्या भावाच्या सुटकेसाठी जीवाचे रान करणाऱ्या बहिणीची भूमिकाही तिने लीलया पार पाडली. या दोन भूमिकानंतर ‘ऐ दिल है मुश्किल’मधील तिच्या ग्लॅमरस भूमिकेने तर पुन्हा एकदा चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडले. या चित्रपटांसाठी तिला बरेच पुरस्कारही मिळाले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानायला ही अभिनेत्री कधीच विसरत नाही. एखादा पुरस्कार जिंकल्यावर ती पती अभिषेक, सासरे अमिताभ बच्चन आणि आपल्या कुटुंबाचे नाव आवर्जून घेते.