चित्रपट निर्मिती आणि इंटेरियर डिझायनर ‘पूनम शेंडे’ हिने  ‘हॉट मोंड मिसेस इंडिया वर्ल्डवाइड २०१६-१७’ हा मानाचा किताब नुकताच पटकावला. मुंबई, दुबई आणि दिल्ली येथे हा संपूर्ण कार्यक्रम तीन टप्प्यांनमध्ये पार पडला. या स्पर्धेमध्ये भारतीय वंशाच्या जगभरातील ५००० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. दिल्ली मध्ये एका शानदार पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांच्या हस्ते पूनमला ‘हॉट मोंड मिसेस इंडिया वर्ल्डवाइड २०१६-१७’ हा  किताब बहाल करण्यात आला. त्यासोबतच पूनमला ‘मिसेस कॉन्फिडेंट’ म्हणूनही गौरविण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्पर्धेसाठी माझ्या मित्र परिवारातील सर्वांनी मला खूप पाठिंबा दिला. माझे पती निलेश, मुलगी, कुटुंबीय, माझ्या ट्रेनर रितिका रामत्री यांचे मी विशेष आभार मानते. माझ्या आयुष्यातील हा अतिशय आनंददायी क्षण आहे” असे म्हणत भविष्यात अभिनय व  सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा पूनमने यावेळी व्यक्त केली.  पूनम शेंडे हिने नुकताच प्रदर्शित झालेल्या जाऊंद्या ना बाळासाहेब तसेच पिंडदान, स्वामी पब्लिक लिमिटेड, मॅटर अशा सिनेमांची निर्मिती केली आहे. इंटेरियर क्षेत्रात सुद्धा पूनम शेंडे हिच्या पूनम शेंडे स्टुडियोने अनेक रेसिडेंशल आणि कमर्शियल प्रोजेक्ट केले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poonam shende won crown of haut monde mrs india worldwide
First published on: 03-12-2016 at 13:15 IST