‘पोश्टर गर्ल’या चित्रपटाची टीम नुकतीच सिध्दिविनायकाच्या दर्शनाला गेली होती. चित्रपटाचा विषय वेगळा आहे. त्याचे वेगळेपण या चित्रपटासाठी काम करणाऱ्या प्रत्येकानेच जपलेले आहे. आपली चांगली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत तितक्याच चांगल्या पध्दतीने पोहोचावी यासाठी बाप्पाचा आशिर्वाद नेहमीच गरजेचा असतो आणि हेच मागणे मागण्यासाठी पोश्टर गर्लची टीम प्रभादेवीच्या सिध्दिविनायक मंदिरात गेली होती.
आपला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडावा हे मागणं मागताना या टीमने भारतवर्षात सुखाची नांदी व्हावी असे साकडे ही सिध्दिविनायकाला घातले. पोश्टर गर्लच्या भूमिकेत असणारी सोनाली कुलकर्णी, कथा, पटकथा आणि अभिनय अशा तिहेरी भूमिकेत असणारे हेमंत ढोमे, दिग्दर्शक समीर पाटील, संगीतकार अमितराज, नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांच्याबरोबर चित्रपटाचे निर्माते पुष्पांक गावडे आणि हादी अली अब्रार ही बाप्पाच्या दर्शनाला गेले होते.

सामाजिक विषयावर विनोदी अंगाने भाष्य करणारा हा वायकॉम18 मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें यांचा ‘पोश्टर गर्ल’ हा चित्रपट येत्या १२ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poshter girl team visited at siddhivinayak temple
First published on: 30-01-2016 at 15:06 IST