‘बाहुबली’नंतर अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. या चित्रपटात प्रभाससह अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच टीझर प्रदर्शित झाला. टीझर पाहता चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि आता त्यातच चित्रपटाचे एक नवे पोस्टर समोर आले आहे.

श्रद्धा कपूरने ‘साहो’चे पोस्टर ट्विटद्वारे सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये श्रद्धा आणि प्रभास बंदूक घेऊन शत्रूंशी सामना करताना दिसत आहेत. दरम्यान त्या दोघांचा लूक चाहत्यांना फार आवडला आहे. सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या चित्रपटामध्ये अॅक्शनचा भरणा करण्यात आला आहे. प्रभास व श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. त्याचसोबत नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर हे कलाकार देखील चित्रपटात दिसणार आहेत.

‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुजीत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘साहो’मधील साहसदृश्यांसाठी हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात बोलावण्यात आली होती. या टीमने प्रभासला अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले होते.