अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आता प्राजक्ता मोठ्या पडद्याकडे वळली आहे. एवढचं काय तर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन ती करते. यावेळी प्राजक्ताने विवाह संस्थांविषयी राग असल्याचे म्हटले आहे.

प्राजक्ताने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत आधी प्राजक्ताने ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह‘ या आगामी चित्रपटाविषयी सांगितले. त्यांनंतर प्राजक्ता जर कधी लग्नाचा विचार करेल तर कोणत्या मॅट्रिमोनियल साईटवर नाव नोंदवून लग्न करेल की कसं करेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्राजक्ता हसून बोलते, आईने आधीच एकदा असा उद्योग केला आहे आणि तोंडावर आपटल्या सारखं झालं आहे. तर मी तिला आधीपासून म्हणाली, की जर मी लग्न करेन तर प्रेमात पडून करेन. कारण मन जुळली पाहिजेत. पण आईचं काय सुरु होतं आणि तिने प्रयत्न केला. काहींना तो मार्ग योग्य वाटतं असेल तर त्यांनी तसं लग्न करावं. जर काहींना माझ्यासारखं प्रेमात पडून लग्न करायचं असेल तर त्यांनी तसं करावं.

आणखी वाचा : “पुष्पा चित्रपट पाहिल्यानंतर मला कळलं की…”, राज ठाकरे यांच वक्तव्यं चर्चेत

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे प्राजक्ता म्हणाली, माझं असं आहे की मला ज्या व्यक्तीविषयी खात्री आहे. मला माहितीये ती व्यक्ती कशी आहे. मला ही गोष्ट मटका किंवा मग जुगार म्हणून नाही करू शकणार. कारण वेळ घालवल्यानंतर नातं पुढे घेऊन जाता येईल का ते कळेल आणि याच कारणामुळे मी लव्ह मॅरेज करेन.