प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाइटमध्ये चित्रीत केलेल्या या सिनेमाचे मोशन पोस्टरही ब्लॅक अॅण्ड व्हाइटमध्ये आहे. पोस्टरमधून काटदरे कुटुंबियांची ओळख करुन देण्यात आली आहे. रवी जाधव आपल्या बायको शैलाची, स्वतःची म्हणजे मोहन काटदरे, मुलगा बच्चू आणि शैलाचे पंडीत साहेब यांची ओळख करुन देताना दिसतो. साध्या माणसांची ही स्पेशल गोष्ट खूप लक्षवेधी असणार असे मोशन पोस्टर बघून तरी वाटते.
पोटापाण्यासाठी कपिलच्या शोवर निर्भर नाही- उपासना सिंग
या काटदरे कुटुंबात रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर अशी तगडी स्टार कास्ट आहेत. सिनेमात मनमीत पेम याचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. गेल्यावर्षी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. या सिनेमाची कथा अजून तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. पण एकंदरीत पोस्टरवरील मनमीतची झलक पाहतात तो यात गतीमंद मुलाच्या भूमिकेत दिसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्यावर्षी गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. तेव्हा प्रसादने या सिनेमाच्या नावाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. हे पोस्टरही ब्लॅक अॅण्ड व्हाइटमध्येच होते. या सिनेमाचे अधिकतर चित्रीकरण ब्लॅक अॅण्ड व्हाइटमध्ये करण्यात आले आहे. आजच्या रंगीत दुनियेत ही ब्लॅक अॅण्ड व्हाइटची स्टोरी प्रेक्षकांच्या मनात किती रुजते हे तर येणारा काळच सांगू शकेल.
Jagga Jasoos song Phir Wahi: बाप- लेकाची हृदयस्पर्शी कहाणी
या सिनेमासाठी अनेकांनी चाकोरी बाहेरचा विचार करण्याचा निर्णय घेतला असेच म्हणावे लागेल. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी हे या सिनेमाची निर्मिती करत आहेत. तर ‘टिपी’ आणि ‘बीपी’ सिनेमाचा दिग्दर्शक रवी जाधव या सिनेमातून अभिनयात पदार्पण करत आहे. स्वरूप रिक्रिएशन अॅण्ड मीडिया प्रा.लि. प्रस्तुत, टीमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स निर्मित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ हा सिनेमा येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.