VIDEO : प्रिया बापट- अभय महाजनच्या ‘गच्ची’ चित्रपटाचा टीझर

गच्चीवरील ही गोष्ट नेमकी काय आहे

अभय महाजन आणि प्रिया बापट

‘गच्ची’… म्हणजे वाढत्या शहरीकरणातील टुमदार इमारतीवर वसलेली एक निवांत जागा. या जागेत काही घटका शांत बसून, आयुष्याचा मार्ग चोखाळता येतो. म्हणूनच तर, सुख असो वा दु:ख, मानवी भावभावनांना वाट करून देणारी ही ‘गच्ची’ प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. हीच ‘गच्ची’ आता सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित ‘गच्ची’ हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

TOP 10 NEWS : सनीच्या देशभक्तीपासून ते प्रभासच्या वाढलेल्या मानधनापर्यंत सर्वकाही एका क्लिकवर

नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर एका हटके अंदाजात टीझर लाँच करण्यात आला. नचिकेत सामंत दिग्दर्शित या सिनेमातील मुख्य कलाकार अभय महाजन आणि प्रिया बापटच्या डिजिटल वॉरमधून, ‘गच्ची’ चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले. या टीझरमध्ये अभय आणि प्रिया दिसत असून, गच्चीवर घडणारा हा सिनेमा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. प्रियाचा एक वेगळा अंदाज यात पाहायला मिळतो. तसेच संपूर्ण सिनेमा याच दोघांवर आधारित असल्याची जाणीव हा टीझर पाहताना होते. या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाचे कुतूहल अधिक वाढलेले दिसून येत आहे. योगेश विनायक जोशी लिखित गच्चीवरील ही गोष्ट नेमकी काय आहे, ही जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली असेल, यात शंका नाही.

PHOTOS : ‘हॅलोविन पार्टी’त पाहायला मिळाला सुहानाचा मोहक अंदाज

दरम्यान, प्रिया बापट आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केलंय. मात्र, अभय महाजन हे नाव आज बऱ्याचजणांना लक्षात आले नसले तरीही, ‘पिचर्स’ वेब सीरिजमधील ‘मंडल’ म्हणताच जवळपास सर्वांच्याच चेहऱ्यासमोर पिचर्समधला साधाभोळा पण, तितकाच तरबेज चेहरा डोळ्यांसमोर येईल. तोच हा अभय महाजन. नाटक, रंगभूमी आणि अभिनय विश्वात अभय काही नवा नाही. ‘रिंगण’नंतर अभयचा हा दुसरा मराठी चित्रपट आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Priya bapat abhay mahajan gachchi official teaser

ताज्या बातम्या