देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास नेहमीच आपल्या चित्रविचित्र वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी प्रियांका निकला दिलेल्या एका अनोख्या भेटवस्तुमुळे चर्चेत आहे. तिने आपल्या पतीला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक कुत्रा भेट स्वरुपात दिला आहे.
निकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करुन घरातील या नव्या पाहुण्याबाबत माहिती दिली. या कुत्राचे नाव त्यांनी ‘गिनो जोनास’ असे ठेवले आहे. “आमच्या घरातील या नव्या पाहूण्याला भेटा. प्रियांकाने सकाळीच मला हा कुत्रा भेटस्वरुपात दिला. ही भेट पाहून मला खुप आनंद झाला आहे”, असे निकने म्हटले. निकने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram