अभिनेत्री प्रियांका चोप्राची ओळख बॉलिवूडमधील एक अभिनेत्री एवढीच राहिली नसून, ती ग्लोबल आयकॉन झालीये. आता आघाडीची अभिनेत्री म्हटल्यावर तिच्या बँक अकाऊंटमध्येही त्याच ओघाने पैसा येत असणार यात काही शंका नाही. प्रियांका नेहमीच तिचे पैसे योग्य पद्धतीने बचत (मॅनेज) करण्यासाठी ओळखली जाते. पण तरीही एवढ्या पैशांचा हिशेब प्रियांका किंवा बाकी कलाकार कसा काय ठेवत असतील, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत असेल. नुकताच प्रियांका चोप्राने ‘ब्लूमबर्ग’ला ती तिचा बँक बॅलेन्स कसा सांभाळते याबद्दल सांगितले.

‘मी माझे पैसे तीन विभागात वाटते. मला किती रुपयांची बचत करायची आहे, किती खर्च करायचे आहेत आणि किती रुपयांचे दान करायचे आहे हे मी आधीच ठरवते.’ असे प्रियांकाने सांगितले. सर्वोत्तम सेव्हिंग काय असेल असा प्रश्न जेव्हा तिला विचारला तेव्हा तिने मुंबई आणि गोव्यात स्वतःची जमीन असणं हे सध्या सर्वोत्तम सेव्हिंग असल्याचं म्हटलं.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारी प्रियांका आंतराष्ट्रीय कायदा, अप्रवासी कायदा, करसंबंधित नियम यांसंबंधी नेहमीच सजग असते. ‘मी कुठे राहते आणि कोणत्या देशात मी किती दिवस राहू शकते. याचा माझ्या व्हिसावर काय परिणाम होईल, या सगळ्याकडे मी जातीनं लक्षं देते. मला गाड्यांचे फार वेड आहे. पण तरीही बॉलिवूडमधल्या सुरुवातीच्या १० वर्षांच्या कारकिर्दित मी नवीन गाडी घेतली नव्हती. शेवटी २०१३ मध्ये माझ्या आईने मला जबरदस्ती करत नवीन गाडी घेण्याचा सल्ला दिला. मग एक दिवस एकत्र जाऊन आम्ही ‘रोल्स रॉइस’ची नवीन गाडी बुक करून आलो.’ असं प्रियांका म्हणाली.

गायक सोनू निगमच्या अजानच्या ट्विटनंतर याचसंबंधित अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच मुद्याला घेऊन साधारण वर्षापूर्वी भोपाळमध्ये ‘गंगाजल २’ सिनेमाच्या प्रमोशनवेळी शूट झालेला प्रियांकाचा एक व्हिडिओ सध्या चांगला व्हायरल होत आहे. यात प्रियांका अजानची आतुरतेने वाट पाहत असल्याचे म्हणताना दिसते.