बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बहुप्रतिक्षीत ‘मेरी कोम’ चित्रपटाचा पहिला पोस्टर खुद्द प्रियांकाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. पोस्टर पाहता, चित्रपटात मुष्ठियोद्धा मेरी कोमची मुख्य भूमिका साकरण्यासाठी प्रियांकाने प्रचंड मेहनत घेतल्याचे जाणवते. 
चित्रपटाच्या या पोस्टरसोबत प्रियांका ट्विटरवर म्हणते की, “या चित्रपटातील भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी मी माझ्यापरीने सर्वकाही दिले आहे. भरपूर मेहनत घेतली आहे. आता सर्व तुमच्या (प्रेक्षकांच्या) हाती आहे.”
या चित्रपटासाठी प्रियांकाने आपल्या शाररिक ठेवणीत बदल केल्याचे पोस्टरवरून लक्षात येते. मेरी कोमचा ‘मुष्ठियोध्दा’ लुक आणण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. ही दोन्ही पोस्टर्स एकुणच चित्रपटाबद्दल आणि मेरी कोमविषयी बरेच काही सांगून जाणारी आहेत. 

  संग्रहित लेख, दिनांक 15th Jul 2014 रोजी प्रकाशित  
 फर्स्ट लूक: ‘मेरी कोम’ प्रियांका चोप्रा
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बहुप्रतिक्षीत 'मेरी कोम' चित्रपटाचा पहिला पोस्टर खुद्द प्रियांकाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला.

  First published on:  15-07-2014 at 09:06 IST  
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra packs a punch in the first poster of mary kom