बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राला झोम्बी व्हायचंय. ट्विटर या सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रियांकाने आपली ही चमत्कारिक इच्छा व्यक्त केली.
‘मला झॉम्बी बनायचंय… जेव्हा कशाचीही जाणीव होत नाही तेव्हा आयुष्य खूपच सोप्पं होऊन जातं… झॉम्बींच्या दुनियेत हे असच सगळं बघायला मिळतं’, असे ट्विट प्रियांकाने केले आहे. बर्फी, मेरी कोम या चित्रपटांतून आपल्या अभिनयात विविधता दाखविणारी प्रियांका सध्या संजय लीला भन्सालीच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. ‘मेकअप चेक करा, केस चेक करा, ड्रेस चेक करा, लाइन चेक करा #BajiraoMastani ‘ , असेही तिने ट्विट केले आहे. बहुदा प्रियांका तिच्या कामामुळे कंटाळलेली दिसत आहे. कारण तिला दिवसरात्र काम करावे लागतं आहे. मात्र, यातूनही तिने वेळ काढून तिची मैत्रीण आणि सलमानची बहिण अर्पिताच्या लग्नाला हजेरी लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra wants to be a zombie
First published on: 21-11-2014 at 01:30 IST