बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या ‘एक्झॉटिक’ या म्युझिक व्हिडिओने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. या अल्बमला युट्यूबवर तीन कोटींपेक्षा जास्त हिट मिळाल्या आहेत. प्रियांकाने यात अमेरिकन गायक रॅपर पिटबुल यांच्यासोबत गाणे म्हटले आहे. तिने गेल्या वर्षी इंग्रजी आणि हिंदीत हे गाणे म्हणून तिच्या चाहत्यांची पुन्हा एकदा मने जिंकली होती.
३१ वर्षीय प्रियांकाचे हे गाणे गेल्यावर्षी ११ जुलै २०१३ रोजी प्रदर्शित झाले होते. ‘थॅक क्यू ऑल फॉर सपोर्ट अँड लव्ह’ असे ट्विट करत प्रियांकाने चाहत्यांचे आभार मानले आहेत. सध्या ती अली अब्बास जफरच्या ‘गुंडे’ या चित्रपटात काम करत आहे. यात तिच्यासोबत रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांच्या भूमिका आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2014 रोजी प्रकाशित
प्रियांकाच्या ‘एक्झॉटिक’ला तीन कोटींपेक्षा जास्त हिट्स
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या ‘एक्झॉटिक’ या म्युझिक व्हिडिओने एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.
First published on: 07-02-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopras exotic viewed by 30 million people