अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. सध्या ती ‘द स्काई इज पिंक’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या एका मुलाखतीत ‘माझा अभिनय पाहून निकला चक्क रडू आले’ असे प्रियांकाने सांगितले.
“मी लग्नाच्या चार दिवस आधीपर्यंत ‘द स्काई इज पिंक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. त्यावेळी माझा पती निक मला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपटाच्या सेटवर हजर राहायचा. चित्रपटातील शेवटच्या सीनचे चित्रीकरण सुरु होते. हा सीन अंधारात चित्रीत केला जात होता. त्या सीनमधील माझा अभिनय पाहून दिग्दर्शक शोनाली बोस व सेटवरील इतर सर्व मंडळींनी माझे टाळ्या वाजवून कौतुक केले. माझे उत्सुर्तपणे होणारे कौतुक पाहून निक भारावून गेला व त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. अशा शब्दात प्रियांकाने तिचा अभिनय पाहून निकला कोसळलेल्या रडूचा किस्सा सांगितला.
सध्या ती ‘द स्काई इज पिंक’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शोनाली बोस यांनी केले आहे. या चित्रपटात प्रियांकाबरोबरच अभिनेता फरहान अख्तर व दंगल फेम अभिनेत्री झायरा वसीम देखील दिसतील.