scorecardresearch

Premium

पुष्कर कधीही माझा मित्र होऊ शकत नाही-मेघा धाडे

सई आणि पुष्कर या दोघांमधील पुष्कर कधी ही माझा मित्र होऊ शकत नसल्याचे मेघा धाडेने पुण्यातील पत्रकार परिषदेतही स्पष्ट केले

मेघा धाडे पुण्यातील पत्रकार परिषदेत
मेघा धाडे पुण्यातील पत्रकार परिषदेत

पुष्कर जोगला मी मित्र मानत नाही कधीही मानू शकणार नाही असे बिगबॉस मराठीची विजेती मेघा धाडेने म्हटले आहे. बिग बॉस मराठीच्या घरात तीन महिने सर्व स्पर्धकांसोबत राहिले. त्या सर्वांसोबत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव वादाचे प्रकार घडले. ते वाद तेवढ्या पुरते होते. त्या घरातून बाहेर पडल्यावर मी सर्व विसरले आहे. मात्र सई लोकूर आणि पुष्कर जोग माझ्या विषयी बाहेर प्रसारमाध्यमाशी बोलताना. मेघा फेक आहे असे हे सतत सांगतात. मी कधी फेक वागली हे त्यांनी दाखवून द्यावे.ते स्वतः कसे वागले हे पाहणे जरुरीचे आहे.तर सई आणि पुष्कर या दोघांमधील पुष्कर कधी ही माझा मित्र होऊ शकत नसल्याचे बिग बॉस मराठी सिझनच्या विजेत्या मेधा धाडे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्ट्या प्रसंगी सांगितले.

पुष्करपेक्षा त्याची पत्नी चांगली मैत्रीण होऊ शकते. तिचा आणि माझा स्वभाव सारखा आहे. यावेळी बिग बॉसमधील प्रवासाबाबत अनेक प्रश्नावर मेधा धाडे यांनी मनमोकळी उत्तरे दिली. यावेळी मेधा धाडे म्हणाल्या की,बिग बॉसच्या घरातील पहिल्या दिवसापासून अखेरच्या दिवसापर्यंत मी सई आणि पुष्कर या दोघांना चांगले मित्र मानले. त्यांच्या विषयी वाईट बोलले नाही. एवढेच नाही तर त्यांना नॉमिनेट देखील केले नाही. असे असूनही त्यांनी अस्ताद काळे याला कॅप्टनसी मिळावी.यासाठी मत दिल्याने मला लगेच फेक ठरवले.

त्यानंतर पुढील तीन आठवडे माझ्यावर अनेक आरोप घरातील मंडळीनी केले. त्यामध्ये जे काही घडले. त्यात सईने पालीची मगर केल्याचा आरोप देखील मेधा यांनी यावेळी केला.तसेच सई आणि पुष्कर च्या सुखात नसेल.पण त्यांच्या दुःखाच्या काळात कायम मेघा धाडे बरोबर असेल.अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या की,बिग बॉस हा कार्यक्रम स्क्रिप्ट नुसार चालवला जातो.असा प्रचार बाहेर ऐकण्यास मिळतो.मात्र त्यामध्ये काही ही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी हा प्रोग्रॅम स्क्रिप्टेड होईल. हा कार्यक्रम फ्लॉप होईल. अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pushkar jog will never become my friend says megha dhade

First published on: 13-08-2018 at 19:50 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×