बॉलिवूडचे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आज पर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केली आहे. त्यात ताल, परदेस, कहो ना प्यार है, वेल कम बॅक यासारखे अनेक चित्रपट आहेत. आता कबीर यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. कबीर यांनी मराठी चित्रपट अदृश्यचे दिग्दर्शन केले आहे.
नुकताच अदृश्य चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. हे अभिनेता पुष्कर जोगंने शेअर केले आहे. चित्रपटाचं पोस्टर शेअर करत पुष्कर म्हणाला, “बॉलिवूडचे प्रथितयश सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आज पर्यंत ताल, परदेस, कहो ना प्यार है, वेल कम बॅक इत्यादी सारख्या अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे आणि आता त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी सिनेमा ‘अदृश्य’ १३ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.” चित्रपटाचं पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यात एका लोकप्रिय सिनेमॅटोग्राफरचे दिग्दर्शनात प्रदर्शन पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व
‘अदृश्य’ हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, मंजिरी फडणीस,अनंत जोग, उषा नाडकर्णी,अजय कुमार सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर अजय कुमार सिंग आणि रेखा सिंग हे चित्रपटाचे निर्माते आहेत. शाहिद लाल यांनी सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाचे संकलन संजय इंगळे यांनी केले आहे आणि संवाद निखिल कटरे व चेतन किंजाळकर यांनी लिहिले आहेत.