Allu Arjun : सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर आता चाहत्यांना ‘पुष्पा २: द रुल’ या बहुचर्चित चित्रपटाचे वेध लागले आहेत. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत. पहिल्या भागात पुष्पा हे पात्र दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने साकारले. त्याचा दमदार अभिनय पाहून संपूर्ण थिएटर टाळ्या आणि शिट्ट्यांनी दणाणले. आता दुसऱ्या भागातही अल्लू अर्जुन पुष्पाच्या भूमिकेत झळकणार आहे. अशात, अभिनेत्याने त्याच्या करिअरबाबत काही चढ उतार आणि त्याच्या यशाबद्दल सांगितले आहे.

रविवारी चेन्नईमध्ये एका भव्य कार्यक्रमात ‘पुष्पा २’ चित्रपटाचं ‘किसिक’ गाणं लाँच करण्यात आलं. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अल्लू अर्जुनने त्याच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली. “सिनेविश्वात पदार्पण आणि पहिला चित्रपट झाल्यानंतर कोणीही माझ्याबरोबर काम करत नव्हतं. फक्त सुकुमारने माझ्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे आज माझं करिअर वाचलं आहे”, असं अल्लू अर्जुनने म्हटल्याचं ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा :शुभमंगल सावधान! ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; पहिला फोटो आला समोर

काय म्हणाला अल्लू अर्जुन?

“मी ‘गंगोत्री’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सिनेविश्वाला एक सुपरहिट चित्रपट दिला. मात्र, यात मी एक अभिनेता म्हणून हवं तसं काम करू शकलो नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कोणीही माझ्याबरोबर काम केलं नाही. त्यानंतर एक डेब्यू चित्रपट निर्माते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला ‘आर्या’ चित्रपटाची ऑफर दिली. त्यानंतर मी माझ्या करिअरमध्ये फार पुढे आलो”, असं अल्लू अर्जुन म्हणाला.

अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’ चित्रपटाचं ‘किसिक’ गाणं लाँच करण्यासाठी कार्यक्रमात आला होता. त्याच्यासह अभिनेत्री रश्मिका मंदानाही होती. मात्र, दिग्दर्शक सुकुमार तेथे नव्हते. त्यांची आठवण काढत अल्लू अर्जुन म्हणाला, “माझ्या करिअरमध्ये मी आज जे काही केलं आहे, त्याचं श्रेय कुणाला द्यायचं असेल तर मी सुकुमार यांना देतो. आताही ते पोस्ट-प्रोडक्शनच्या कामात व्यस्त आहेत. त्यांच्या उपस्थितीपेक्षा त्यांची अनुपस्थिती खूप काही सांगते. मला तुमची आठवण येते सुक्कू, आपण सगळे एक आहोत.”

हेही वाचा : घटस्फोटाची घोषणा केल्यावर ए आर रेहमान यांच्याशी जोडलं गेलं नाव; मोहिनीने सोडलं मौन; म्हणाली, “ते माझ्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसिद्ध दिग्दर्शक सुकुमार यांनी २००४ मध्ये आलेला चित्रपट ‘आर्या’मधून त्यांच्या कामाला सुरुवात केली. या चित्रपटात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत होता. २००९ मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल ‘आर्या २’ प्रदर्शित झाला. सुकुमार यांच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती.