सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सनॉन यांचा ‘राबता’ हा सिनेमा उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सिनेमाच्या निर्मात्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. ‘राबता’ची कथा तेलगु सुपरहिट सिनेमा ‘मगधीरा’वरुन कॉपी केल्याचा आरोप लावण्यात आला होता. यासंदर्भात ‘मगधीरा’ सिनेमाचे निर्माते अल्लु अरविंद यांनी हैद्राबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण या प्रकरणात न्यायालयाने ‘राबता’ सिनेमाच्या बाजूने निकाल देत, हा सिनेमा ‘मगधीरा’ सिनेमाचा कॉपी नसल्याचे स्पष्ट केले.
अखेर शिवगामीच्या व्यक्तिरेखेबद्दल श्रीदेवी बोलली
न्यायालयात या विषयावर जवळपास ५ तास चर्चा झाली. ‘राबता’ आणि ‘मगधीरा’ या दोन्ही सिनेमांची संहिता आणि कथा यात खूप फरक असल्याचे यातून निष्पन्न झाले असे टी-सिरीजचे वकील अंकित रेलन यांनी सांगितले.
‘मगधीरा’ सिनेमाचे निर्माते अल्लु अरविंद यांनी आपली कथा चोरल्याचा आरोप ‘राबता’च्या निर्मात्यांवर आणि दिग्दर्शकावर केला होता. मात्र आता न्यायालयाने ‘राबता’च्या टीमला हिरवा कंदील दिल्यामुळे हा सिनेमा कोणत्याही अडचणींशिवाय उद्या प्रदर्शित केला जाणार आहे.
‘राबता’ सिनेमाचा दिग्दर्शक दिनेश विजन यासिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. सुशांत आणि क्रिती सनॉनची ऑनस्क्रिन केमिस्ट्री सध्या तरी प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसून येते .पण याचा फायदा सिनेमाला किती होतो हे तर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.
…आणि रजनीकांत अमृता फडणवीसांना भेटले
दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने जर यू/ ए प्रमाणपत्र हवं असेल तर या सिनेमातील काही च्युंबन दृश्य आणि अश्लिल भाषा काढून टाकण्याच्या सुचना दिल्या आहेत. अन्यथा सिनेमाला ए प्रमाणपत्र देण्यात येईल असेही बोर्डाने स्पष्ट केले. सिनेमात सुशांत आणि क्रितीसोबतच जिम सर्भ आणि राजकुमार राव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जिम सर्भ याआधी ‘नीरजा’ सिनेमात दिसता होता, तर राजकुमारने ३२४ वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली आहे. दिनेश विजान दिग्दर्शित ‘राबता’ सिनेमा ९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.