‘सुलतान’समोर ‘रईस’ची माघार

शाहरूख खानच्या ‘फॅन’ चित्रपटाची धास्ती शाहरूखच्या ‘रईस’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतली आहे.

जुलैऐवजी आता थेट पुढच्या २६ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होणार
मोठा गवगवा करूनही तिकीटबारीवर अपयशी ठरलेल्या शाहरूख खानच्या ‘फॅन’ चित्रपटाची धास्ती शाहरूखच्या ‘रईस’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतली आहे. त्यामुळेच रमजान ईदच्या मुहूर्तावर, जुलैमध्ये सलमान खानच्या ‘सुलतान’ या चित्रपटासोबत सिनेमागृहात झळकणार असलेल्या ‘रईस’चे प्रदर्शन पुढील वर्षी जानेवारीपर्यंत लांबणीवर पडले आहे. सलमान आणि शाहरूख या दोघांचे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांसह हिंदी चित्रपटसृष्टीलाही हे द्वंद्व अनुभवयाचे होते. परंतु अखेर शाहरूखच्या ‘रईस’ने माघार घेतली.
‘सुलतान’ आणि ‘रईस’ या दोन्ही चित्रपटांची चर्चा बराच काळ आधीपासून आहे. या दोन्ही चित्रपटांच्या एकत्र प्रदर्शनावरून सलमान खान आणि शाहरूख खान दोघांनाही कित्येकदा विचारणा झाली होती. त्या वेळी दोघांनीही मत्री असली तरी चित्रपटांचा व्यवसाय ही वेगळी गोष्ट असल्याचे म्हटले होते. मात्र ‘रईस’ पुढे जाण्यात व्यवसायाचा भाग जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाहरूखच्या ‘दिलवाले’ आणि नुकत्याच प्रदíशत झालेल्या ‘फॅन’ या दोन्ही चित्रपटांच्या पदरी अपयश आले. त्यामुळे ‘रईस’च्या बाबतीत जास्त काळजी घेतली जाते आहे. सलग १०० कोटींचा गल्ला जमवणारे चित्रपट देणाऱ्या सलमानच्या ‘सुलतान’शी टक्कर घेणे व्यवसायाच्या दृष्टीने परवडणारे नाही. त्यामुळे चित्रपट पुढे ढकलणेच निर्माते फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी पसंत केले. मात्र हा निर्णय उशिरा झाला असल्याने या वर्षीच्या सणाची तारीख मिळाली नाही.
या वर्षी ईदला ‘सुलतान’, स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर अक्षयकुमारचा ‘रुस्तूम’, दिवाळीत अजय देवगणचा ‘शिवाय’ आणि नाताळला आमिरचा ‘दंगल’ प्रदर्शित होणार असल्याने ‘रईस’चे प्रदर्शन थेट पुढच्या वर्षीच्या तारखांवर अवलंबून आहे.
चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय कोणत्याही निर्मात्यांसाठी सोपा नसतो. मात्र ‘रईस’सारख्या मोठय़ा चित्रपटाला प्रदर्शनासाठी योग्य तारीख मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेत आहोत, असे फरहान अख्तरने स्पष्ट केले आहे. पुढच्या वर्षी पहिल्या महिन्यातही आधी हृतिक रोशनचा ‘काबिल’ आणि अजयचा ‘बादशाहो’ प्रदíशत होणार असल्याने ‘रईस’ २६ जानेवारीला प्रदíशत करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raees release date cancelled due to sultan

ताज्या बातम्या