बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा आगामी रईस या सिनेमातले लैला हे गाणे प्रदर्शित झाले. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये या गाण्यावर सनी लिओनी थिरकताना दिसत आहे. शाहरुख खानने २४ डिसेंबरला एक व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला. या व्हिडिओला उद्देशून त्याने म्हटले की, असे नृत्य करु नका, मी असे नृत्य करु शकत नाही. शाहरुखच्या या ट्विटला हजारो लाइक्स आले तर ७८६ लोकांनी अर्ध्या तासाच्या आत या ट्विटला रिट्विट केले. यूट्युबवरही या व्हिडिओला फार चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मोहित जैन डान्स इन्स्ट्रिट्युटच्या या व्हिडिओने आपल्या नृत्य न्स्ट्रिट्युटच्या प्रमोशनसाठी हे नृत्य यूट्युबवर शेअर केले. ज्या गाण्यावर या मुलांनी नृत्य केले ते १९८० मधील कुबार्नी या सिनेमातले आहे. हेच गाणे रईसमध्ये रिमेक करुन वापरण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी नवीन वर्षाच्या रात्री एका नामांकित हॉटेलमध्ये लैला या गाण्यावर नृत्य करण्यासाठी सनीला ४ कोटी रुपयांचे मानधन मिळणार असल्याची बातमी आली होती. पण खुद्द सनीनेच असे काहीही घडले नसल्याचे स्पष्ट केले. जर मला या गाण्यावर नृत्य करण्यासाठी ४ कोटी मिळाले असते तर माझ्या एवढी आनंदी या जगात कोणच नसती. पण असे काहीही घडले नाहीये. असे काही घडण्याची मी वाट मात्र नक्कीच बघतेय असे सनीने सांगितले.
दरम्यान, ‘रईस’ हा सिनेमा गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती सिनेमाचे कथानक फिरताना दिसणार आहे. या सिनेमातील भूमिका उठावदार करण्यासाठी शाहरुख खानने लतीफच्या मुलाचीही भेट घेतली होती. लतिफचा मुलगा मुश्ताक अहमदने शाहरुखला सहकार्य देखील केले. या सिनेमाच्या चर्चेला नव्याने तोंड फुटले ज्यावेळी लतिफच्या मुलाने शाहरुखकडे १० कोटीची मागणी केल्याची माहिती मिळाली. मुश्ताकने पैशांची मागणी केल्यानंतर शाहरुखने त्याला भेटण्यास टाळाटाळ केली. इंग्रजी वृत्तपत्र ‘डिएनए’ ने दिलेल्या वृत्तानुसार, मुश्ताकने शाहरुखकडे १० कोटीची मागणी केली आहे. तसेच सध्या शाहरुखच्या सिनेमाच्या प्रदर्शनामध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी मुश्ताक तयारी करत असल्याची देखील चर्चा आहे. शाहरुख खान, नवाझुद्दिन सिद्दिकी, माहिरा खान, मोहम्मद झिशान आयुब यांच्या या सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत.