राजस्थान रॉयल्स संघमालक राज कुंद्रा यांनी पत्नी शिल्पा शेट्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर आयपीएल फिक्सिंगच्या प्रकरणावरून चाललेल्या वादाबद्दल माफीही मागितली. राजस्थान रॉयल्स संघाच्या तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंग प्रकरणावरून झालेल्या अटकेनंतर संघमालकांवर संशयाचे सावट पसरले होते. त्यानुसार पोलिसांनी राज कुंद्रा यांची चौकशीही केली. संघाचे नाव फिक्सिंग प्रकरणात गोवले गेल्याने राज कुंद्रा यांनी आपल्या टि्वटर वरून शिल्पा शेट्टीची माफी मागितली व वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राज कुंद्रा दोषी आढळल्यास राजस्थान रॉयल्स संघातील मालकी हक्क कुंद्रा यांना गमवावा लागणार आहे. राज कुंद्रा यांनी ट्विटरवर म्हटले की, “माझ्या सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, गेले काही दिवसांपासून ज्या परिस्थितीतून तुला जावे लागले त्यासाठी श्रमा. सत्य लवकरच समोर येईल”. तसेच कुंद्रा यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसाबद्दल अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल ट्विटरवरून त्यांचे आभार मानले.