बॉलिवूड अभिनेता राजीव खंडेलवाल सध्या ‘सम्राट अॅण्ड कं’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात व्यस्त असून, याच चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमावरून परतत असताना मिरा रोडजवळ राजीवच्या गाडीला अपघात झाला. ‘वॉटर किंग्डम’येथील प्रसिद्धी कार्यक्रम उरकून राजीव आपल्या गाडीत बसून परतत असताना त्याच्या गाडीला अन्य एका गाडीने धडक दिली. गाडीतील अन्य कोणाला काही झाले नसले, तरी राजीवच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. त्याला जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री मडलसा शर्मा आणि प्रसिद्धी कार्यक्रमाशी निगडीत चमू यावेळी राजीवबरोबर होता. राजीवच्या गाडीला धडक दिलेल्या वाहनातील महिलांनादेखील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गोराई पोलीस स्थानकातील पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. पोलीस पुढील तपास करत असून, डॉक्टरांनी राजीवला तीन अठवड्याची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2014 रोजी प्रकाशित
राजीव खंडेलवालच्या गाडीला अपघात
बॉलिवूड अभिनेता राजीव खंडेलवाल सध्या 'सम्राट अॅण्ड कं' चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात व्यस्त असून, याच चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमावरून परतत असताना मिरा रोडजवळ राजीवच्या गाडीला अपघात झाला.
First published on: 28-04-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajeev khandelwal injured in road accident