छोट्या पडद्याकडून रुपेरी पडद्याकडे वळणारा अभिनेता राजीव खंडेलवाल त्याच्या आगामी चित्रपटात हेरगिरी करताना दिसणार आहे. कविता बरजात्याची निर्मिती असलेल्या ‘सम्राट अॅण्ड को’ या चित्रपटात तो हेराच्या (डिटेक्टीव) भूमिकेत दिसेल.
या चित्रपटात राजीवसोबत मदालसा शर्मा ही नव अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राजश्री प्रोडक्शन हे कौटुंबिक चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी ओळखले जाते. परंतु, यावेळेस ते पहिल्यांदाच हेरगिरीवर आधारित रहस्यमय चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी १ मे २०१४ला प्रदर्शित होणार आहे.
‘सम्राट अॅण्ड को’ या चित्रपटाबरोबरच अरशद वारसीचा ‘मि. जो बी कार्व्हेलो’, रणबीर कपूरचा ‘जग्गा जासूस’, सुशांत सिंगचा ‘डीटेक्टीव ब्योमकेश बक्शी’, विद्या बालनचा ‘बॉबी जासूस’ आणि अनुष्काचा ‘एनएच १० ‘हे हेरगिरीवर आधारित चित्रपट २०१४मध्ये प्रदर्शित होणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2013 रोजी प्रकाशित
राजीव खंडेलवाल लवकरच डिटेक्टीवच्या भूमिकेत
छोट्या पडद्याकडून रुपेरी पडद्याकडे वळणारा अभिनेता राजीव खंडेलवाल त्याच्या आगामी चित्रपटात हेरगिरी करताना दिसणार आहे.
First published on: 26-11-2013 at 12:13 IST
TOPICSबॉबी जासूस
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajeev khandelwal to play detective in his next