scorecardresearch

माझा वाढदिवस साजरा करू नका- रजनीकांत

सुपरस्टार रजनीकांत येत्या शनिवारी ६४ वर्षांचे होतील.

माझा वाढदिवस साजरा करू नका- रजनीकांत
आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन रजनीकांत यांनी चाहत्यांना केले आहे.

दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू चालविणारे सुपरस्टार रजनीकांत येत्या शनिवारी ६४ वर्षांचे होतील. मात्र,  आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन रजनीकांत यांनी चाहत्यांना केले आहे.
तामिळनाडूला पुराचा तडाखा बसल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. त्यांच्या जवळच्या सूत्रांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला माहिती दिली की, अतिवृष्टीने तामिळनाडूला झोडपल्यानंतर तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रजनीकांत यांनी चाहत्यांना आपला मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले. तसेच, आपला वाढदिवस साजरा करण्यापेक्षा सध्या राज्याला मदत करणे जास्त महत्त्वाचे असल्याचे त्यांचे मत आहे.
दरम्यान, त्यांच्या वाढदिवशी ‘एन्थिरन २’ या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात येणार होती. मात्र, सदर चित्रपटाविषयीची अधिकृत घोषणा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे कळते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2015 at 15:22 IST

संबंधित बातम्या