यंदाच्या वर्षी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आमच्या फार्महाऊसवर एकत्र जमून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. माझ्या घरच्यांसोबत वेळ घालवल्याचाही आनंद आणि नव्या वर्षाचं सेलेब्रिशन करता येईल. त्याचसोबत २०१६ वर्षाचं रिजोल्यूशन सुद्धां मी केलं आहे. यावर्षी मी माझ्या कामाचं आणखी चांगल्यारीतीने प्लानिंग आणि त्याचं काटेकोर पद्धतीने पालन करणार आहे. गेल्या वर्षी माझं शेड्यूल्ड खूप मोघम होतं ज्यामुळे माझी रोजची कामं बऱ्याच प्रमाणात विस्कळीत होती. त्या गोष्टीची काळजी मी यावेळेस पुरेपूर घेणार आहे. येत्या वर्षात ५ फेब्रुवारी रोजी माझा ‘वृंदावन’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमात मी पहिल्यांदाच अॅक्शनसीन दिले आहे जे पाहताना प्रेक्षकांना राकेश बापट एका वेगळ्याच रुपात पाहायला मिळेल.
अभिनेता- राकेश बापट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakesh bapat celebrating new year with family
First published on: 01-01-2016 at 13:06 IST