scorecardresearch

Premium

चिमुकल्या फॅनकडून राखीला महागडा मोबाइल गिफ्ट; किंमत ऐकून व्हाल थक्क!

गिफ्ट पाहून राखी थक्क

rakhi-sawant- Samsung Galaxy Z

राखी सावंत वेगवेगळ्या कारणांमुळे कायमच चर्चेत असते. बिग बॉसचा शो संपला असला तरी राखीच्या चर्चा काही संपताना दिसत नाहित. नुकतीच राखी गोवा ट्रीपवरून परतली आहे. गोव्यामध्ये राखीने चांगलीच धमाल केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत गोवा ट्रीपचे अपडेट चाहत्यांना दिले आहेत.

गोवा ट्रीपमध्ये राखीला एक लहागी फॅनदेखील भेटली. या चिमुकलीसोबत राखीने काही व्हिडीओ शेअर केले आहेत. मात्र या चिमुकल्या फॅनने राखीला एक खास गिफ्ट दिलंय. हे गिफ्ट पाहून राखीला आनंदाचा धक्का बसला. या चिमुकल्या फॅनने एक महागडा फोन गिफ्ट केला आहे. राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Viral video: Woman's 'soap-eating' act takes internet by storm, but it's not what you think
‘मला साबण आवडतो’ म्हणत मुलीने साबणच खाल्ला; Videoची खरी बाजू बघून बसेल धक्का
rahul vaidya and disha parmar
Rahul Vaidya And Disha Parmar: राहुल वैद्यच्या मुलीची पहिली झलक समोर; बहिणीने केला फोटो शेअर
sonakshi sinha
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने मुंबईत खरेदी केलं नवीन घर; ‘अशी’ आहे ही अलिशान मालमत्ता
mrunmayee deshpande gautami deshpande fight
Video : “तुला बघते थांब…”, मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचं भर सेटवर भांडण, व्हिडीओ आला समोर

राखीने शेअर केलेल्या व्हिडीओत एक चिमुकली राखीला एक बॉक्स देताना दिसतेय. राखीने पावरी स्टाईलने तिच्या या फॅनची ओळख करून दिली आहे. “ये मैं हूं, ये मेरी फैन है पारुल और ये मेरे लिये क्या लाई है? एक सरप्राइज गिफ्ट.’ असं म्हणत राखीने फोनच्या अनबॉक्सिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. फोन पाहिल्यानंतर राखील आश्चर्याचा धक्का बसल्याचं दिसतंय. ” एवढा मोठा फोन कसा असू शकतो?” असं ती म्हणाली आहे. त्यानंतर तिने या चिमुकलीला मिठी मारत तिचे आभार मानले आहेत.

असं मिळेल करोनावर नियंत्रण; राखी सावंतने सांगितला उपाय!

तर राखी सावंतला गिफ्ट करण्यात आलेला फोन हा 40 किंवा 50 हजारांचा नाही. तर जवळपास दीड लाख रुपये किंमतीचा मोबाईल राखीला तिच्या फॅनने गिफ्ट केला आहे. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर अनेक चाहत्यांनी राखीला गिफ्ट मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakhi sawant get expensive phone as gift from little fan in goa kpw

First published on: 06-04-2021 at 12:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×